• Sat. Sep 21st, 2024
कोणी मध्ये आला तर मारुन टाका; जिथे दहशत माजवली, तिथेच माज उतरवला, पुण्यात गुंडाची धिंड

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आयुक्त रितेश कुमार यांनी १००हून अधिक सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. त्यानुसार गुन्हेगारी परिसरात पोलिसांना निर्देश देऊ कडक गुन्हा करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी हडपसर पोलीस ठाण्याअंतर्गत एका टोळक्याने हैदोस घालत सात ते आठ गाड्या फोडल्या होत्या. सर्रास हवेत कोयता फिरवत ”कोणी मध्ये आलं तर त्याला मारून टाका”, अश्या धमक्या दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत गुन्हेगारांना अटक केली होती. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवत गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी ज्या ठिकाणी गाड्या फोडल्या त्याच परिसरातून त्यांची धिंड काढली आली आहे. धिंड काढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हयरल होत आहे.
नागपूरमध्ये संघ-भाजपच्या गोटात गुप्त हालचाली, ‘ती’ चर्चा खरी ठरणार? आव्हाडांचा धक्कादायक दावा
खडक पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन हडपसर परिसरातील वैदुवाडी येथे एका टोळक्याने रस्त्यावरील सात ते आठ वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवण्याचा प्रकार घडला होता. तसेच आरोपींनी त्यांच्या हातातील धारदार कोयते हवेत फिरवत ”कोणालाही ही सोडू नका, जो आडवा येईल त्याला मारा, कोणी मध्ये आल्यास जिवंत सोडणार नाही”, अशी धमकी दिली होती.

या प्रकरणी तानाजी मारुती खिलारे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पी.एस.आय विजयकुमार शिंदे, अविनाश शिंदे आणि पोलीस कर्मचारी यांनी आरोपींचा तात्काळ शोध घेत आठ आरोपींना अटक करुन त्यांचे पाच विधीसंघर्षित बालक साथीदारांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून परिसरातून धिंड काढली आहे.
सावधगिरी हवी, भीती नको! देशात पुन्हा करोनाची एन्ट्री, २४ तासात ६१४ नवे रुग्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed