• Sat. Sep 21st, 2024
धावत्या रेल्वेतून उतरणे महागात! ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच उडी मारली, नववीतील मुलाने गमावला पाय

रायगड: रेल्वे गाडीत चढताना किंवा उतरताना सुरक्षित अंतर बाळगणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा पुरेशी खबरदारी न घेता हयगय केल्याने जीवावर बेतण्याच्या घटना घडतात. माणगावमधील गोरेगावमध्ये दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. दिवा-रत्नागिरी पेसेंजर गाडी दिवावरून वीर असा प्रवास करते.
मोठी बातमी, गडचिरोलीत आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा, १०० मुलींना रुग्णालयात हलवले
आजच्या सकाळी भिवंडी येथील इयत्ता ९ वी मध्ये शिकणारा मोमीन अकबर कलाम हा याच गाडीतून प्रवास करत राजेवाडी – चांढवा येथील बोर्डिंग उर्दू शाळेत जात होता. मात्र गोरेगाव येथे रेल्वे गेट क्र १५ वर रेल्वे आल्यानंतर गाडी प्लॅटफॉर्मवर उभी राहायच्या पूर्वीच मोमीनने चालत्या गाडीतून बाहेर उडी टाकली. यात त्याचा पाय घसरून मोमीन खाली पडला. त्यावेळी त्याचा उजवा पाय गाडीच्या चाकाखाली आला आणि क्षणार्धात त्याच्या पायाचा तुकडा पडला. अत्यंत भयानक पद्धतीने झालेल्या या अपघातात मोमीनला आपला पाय गमावला लागला आहे.

आपलं कुटुंब आपली जबाबदारी, सगळी कंत्राटं सोयऱ्यांच्या घरी ; शिंदेंकडून ठाकरेंवर आरोपांच्या फैरी

यानंतर मोमीनला उपचारासाठी गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. गोरेगावकर यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबईतील केएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed