• Sat. Sep 21st, 2024
यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णा खोत यांच्या विस्थापिताचा आवाज मांडणाऱ्या ‘रिंगाण’ ला

कोल्हापूर : विस्थापित झाल्यानंतर आपल्या भूमीपासून लांब फेकले गेल्याची तयार झालेली धरणग्रस्तांची भावना, पावलापावलावर येणाऱ्या अडचणी, मनाला अस्वस्थ करणारा नवीन परिसर आणि प्राण्याबरोबरचा सततचा संघर्ष, बदलते ग्रामीण जीवन या सर्वांचे चित्रण करणारी कृष्णात खोत यांची कादंबरी म्हणजे रिंगाण. अतिशय प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या पुरस्काराचे माहोर उमटल्यानंतर विस्थापितांच्या संघर्षाला आणखी बळ मिळणार आहे…. ‘सामान्य खेडुतांसह त्यांच्या अनेक पिढ्यांची होणारी फरफट आजही मनाला अस्वस्थ करून जाते. अस्वस्थता अजून संपलेली नाही. त्यामुळं अजून लिहायचं आहे. पुरस्काराने त्याला आणखी उर्जा मिळाली आहे… ही आहे खोत यांची पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची प्रतिक्रिया.

गावठाण, रौंदाळा, झडझिंबड अशा अनेक कादंबरीच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती आणि संघर्ष मांडणाऱ्या खोत यांच्या रिंगाण’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. यापूर्वी त्याला महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कारही मिळाला होता. नव्या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या साहित्य लेखनाचा गौरव झाला. विस्थापितांच्या जगण्याच रिंगाण मध्ये खोत यांनी केलेले चित्रण अतिशय मनाला भावणारे आहे. या कादंबरीचा नायक आहे देवाप्पा. देवाप्पाची गावापासून उखडल्याची वेदना आणि पाळीव प्राण्यांचं मूळ आदिम हिंस्त्रभावाकडे होणाऱ्या स्थानांतराचं चित्रण आहे. माणूस आणि प्राणी, विकास आणि आधुनिकपूर्व जगातले अंतर्विरोध यांच्यातल्या सूक्ष्म परी ते कादंबरीत आहेत.

विस्थापित झाल्यानंतर आपल्या भूमीपासून लांब फेकले गेल्याची तयार झालेली भावना,मनाला अस्वस्थ करणारा नवीन परिसर, वातावरण आणि प्राण्याबरोबरचा संघर्ष यामध्ये मांडला आहे. देवाप्पा आणि म्हशींचं जीवघेणी झटापट यामध्ये आहे. मानवाचा व पाळीव प्राण्यांचा संघर्ष यामध्ये आहे. विस्थापन, आधुनिकतेचे पेच, प्राण्यांची मूळ आदिम हिंस्त्रता, माणूस आणि निसर्ग यांतील अनेक परिमाणांना साकार करणारी ही कादंबरी आहे.

तृतीयपुरुषी कथन आणि देवाप्पाच्या आत्मपर कथनाच्या संगमिसळीतून एक अनोखं कथनरूप कादंबरीत आहे. मराठी कादंबरीत एका अनोख्या विचारसूत्राचं आणि प्रदेशसंचितांचं वैभव दाखवणारं हे कथनरूप आहे. आधुनिकतेचे पेचप्रश्न, विस्थापन, माणूस आणि निसर्ग-प्राणी यांच्यातील संघर्षाचं प्रभावी चित्रण करणारी ही अतिशय वेगळी कादंबरी आहे.
हसन मुश्रीफ यांना धक्का, अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष भाजपच्या वाटेवर

कृष्णात खोत यांच्याविषयी

पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या निकमवाडी येथे जन्मलेल्या कृष्णात खोत यांनी कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजलमधून बी.ए. झाल्यानंतर बीएड करून क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या शिक्षण संस्थेत वसतिगृहाचा रेक्टर म्हणून काम सुरू केले. नोकरी करत करत इतिहास, राज्यशात्र आणि मराठीतून एमए केले. त्यानंतर पन्हाळा तालुक्यातील कळ्यातीलच ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक त्यांना नोकरी लागली.

खोत यांची २००५ मध्ये ‘गावठाण’ ही कांदबरी पुस्तक रूपानं प्रसिद्ध झाली. त्यानंतर रौंदाळा, झडझिंबाड, धुळमाती व रिंगाण या त्यांच्या कादंबरीने साहित्य विश्वात वेगळी प्रतिमा निर्माण केली. ग्रामीण जीवन आणि बदलते ग्रामसंस्कृती त्यांच्या कादंबरीत दिसते.

२०१२ला ‘झड झिंबड’ ही कांदबरी प्रकाशित झाली. या कादंबरीचा नायक पाऊस आहे. वाढणाऱ्या अंधश्रधदेचे वर्णन ‘झड झिंबड’मध्ये आहे. खेड्यातील जमिनीच्या व्यवहारांवर भाष्य करणारी कादंबरी म्हणून ‘धूळमाती’कडे पाहिलं जाते. ‘नागरल्या विना भुई’ हे पुस्तक म्हणजेखेडुतांच्या नैसर्गिक जगण्याविषयीचे हे व्यक्तिचित्रण आहे.

शेसव्वाशे घरांच्या निकमवाडी सारख्या वाडीतून देशाच्या राजधानीत आपल्या लेखणीची नाममुद्रा उमटवणारा लेखक म्हणून गौरव झाला याचा आनंद आहे. मराठीतील अव्वल दर्जाची कादंबरी म्हणून दिल्या जाणाऱ्या देशपातळीवरच्या साहित्य अकादमी सन्मानाने रिंगाण या कादंबरीचा गौरव झाला, यामुळे माझ्या साहित्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. हा मराठी साहित्याचा गौरव आहे. विस्थापितांच्या संघर्षाला यामुळे पाठबळ मिळाले आहे. जबाबदारीने लिहिणाऱ्यांनाच नव्हे तर जबाबदारीने कोणतही सर्जनशील काम करणाऱ्यांचा सन्मान होणे हे फक्त त्याच्याच नाही तर समाजाच्याच आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते. तसे झाल्याने याचाच विशेष आनंद आहे, असं कृष्णात खोत म्हणाले.
मराठीतील अव्वल दर्जाची कादंबरी म्हणून दिल्या जाणाऱ्या देशपातळीवरच्या साहित्य अकादमी सन्मानाने कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीचा गौरव करण्यात आला आहे. यासंदर्भात ते म्हणाले की, जबाबदारीने लिहिणाऱ्यांनाच नव्हे तर जबाबदारीने कोणतंही सर्जनशील काम करणाऱ्यांचा सन्मान होणे हे फक्त त्याच्याच नाही तर समाजाच्याच आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते.

तुम्हाला जिल्हाधिकारी होण्यात इंटरेस्ट आहे का? हसन मुश्रीफ महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर संतापले,काय घडलं?

साहित्य अकादमीची स्थापना कधी झाली?

लेखकांना साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी १९५४ मध्ये साहित्य अकादमीची स्थापना केली होते. याचे पहिले अध्यक्ष तत्कालीन पंतप्रधान जवाहलाल नेहरु होते. भारताचा समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या साहित्यिक वारशाला प्रोत्साहन देण्याचं काम साहित्य अकादमीकडून करण्यात येतं.
वेध लोकसभा निवडणुकीचा : दावेदारच अधिक, प्रबळ मात्र कमीच, कोल्हापूर लोकसभेची गणिते काय?
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed