• Mon. Nov 25th, 2024
    हिंदू धर्मानुसारही ठाकरे गटच योग्य, कामतांच्या युक्तिवादात गौतम ऋषींच्या न्यायसूत्रांचा दाखला

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिल्याचा आरोप करीत शिंदे गटाने त्यांची कास सोडली. मात्र, हिंदू धर्मानुसारसुद्धा ठाकरे गटच योग्य असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी गौतम ऋषींनी दिलेल्या न्यायसूत्रांचा दाखला दिला.

    हिंदू धर्मातील प्राचीन न्याय सूत्रांनुसार न्यायनिवाडा करताना प्रत्यक्ष प्रमाण (प्रत्यक्ष पुरावा), अनुमान (अंदाज), शब्द (तोंडी जबाब), उपमान (तुलना), अर्थपत्ती (गृहितक), संभव (शक्यता) आणि ऐतिह्य (अफवा) या बाबी विचारात घ्याव्या लागतात. त्यानुसार, उद्धव ठाकरे गटाने सादर केलेली कागदपत्रे अर्थात पक्षाची कार्यकारिणी आणि राजकीय पक्षाद्वारे बजावण्यात आलेला व्हीप अर्थात पक्षादेश सुनावणी दरम्यान मांडण्यात आला.

    हे प्रत्यक्ष पुरावे असून ते सिद्ध होत आहेत. त्यामुळे हे पुरावे न्याय सूत्रांमधील पहिल्याच प्रत्यक्ष प्रमाणाचा निकषावर खरे उरतात. याउलट शिंदे गटाचा युक्तिवाद हा ऐतिह्य अर्थात अफवांवर आधारित आहे. त्यांनी दिलेले पुरावे सिद्ध होत नाहीत. त्यामुळे ठाकरे गटाचा युक्तिवाद योग्य असून तो मान्य करण्यात यावा, असा दावा कामत यांनी केला.

    दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला गिरीश महाजनांच्या हजेरीचा आरोप, केसरकर म्हणतात, तो फोटो तर…

    विधीमंडळ पक्षाचे अधिकार हे कोरा चेक नाही

    राजकीय पक्षाने विधिमंडळ पक्षाला दिलेले अधिकार म्हणजे काही कोरा चेक नाही. जसे ते अधिकार देण्याचा हक्क राजकीय पक्षाकडे आहे तसेच ते परत घेण्याचाही त्यांचा हक्क अबाधित आहे, असा युक्तिवाद यावेळी कामत यांनी केला.

    सलीम कुत्ताची १९९८ मध्येच हत्या, नितेश राणेंचे आरोप खोटे, काँग्रेस आमदाराचा खळबळजनक दावा

    छत्रपतींचा अपमान

    शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भारतसेठ गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले म्हणून आम्ही गेलो, असे वक्तव्य साक्षी दरम्यान केले आहे. छत्रपतींच्या नावाने सुरतेला जाता तर मग जिवाला धोका असल्याचे आरोप का करता? हा छत्रपतींचा अपमान असल्याचाही युक्तिवाद कामत यांनी केला. तसेच सगळ्या आमदारांना स्वप्न पडले आणि ते सुरतला गेले असे होऊ शकत नाही, हे षडयंत्र होते, हेच यावरून दिसून येते, असेही ते म्हणाले.

    दोन तृतीयांश आमदार पाठीशी, म्हणून पक्ष तुमचा होत नाही, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाचा युक्तिवाद

    कामतांच्या युक्तिवादातील काही मुद्दे

    -शिंदे गटाने राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलाविली नाही. त्यांनी कुणालाच नोटिसही पाठविल्या नाही.
    -राज्यपालांनी आमदारांच्या भानगडीत पडू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे.
    -महाविकास आघाडीचा निर्णय हा राजकीय पक्षाचा होता. त्यातून बाहेर पडण्याचा अधिकार विधिमंडळ पक्षाला नव्हता.
    -विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप बजावला नसता तरीसुद्धा शिवसेनेचे राजन साळवी उमेदवार असताना त्यांच्याविरुद्ध मतदान करणे चूकच.
    -गोगावले यांनी व्हॉट्सऍपद्वारे पाठविलेले व्हीप त्यांच्या क्रमांकावरून पाठविण्यात आले नाहीत.
    – हे व्हीप १०.५० पोहोचले त्याचवेळी गोगावले विधानभवनात पोहोचल्याचे त्यांनी मान्य केले आहे त्यामुळे ते खोटं बोलत असल्याचे दिसून येते.

    विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरे आणि अमोल मिटकरींची चालता चालता चर्चा

    Read Latest Maharashtra Updates And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *