• Sat. Sep 21st, 2024

गुगलवर उच्चभ्रू परिसर शोधायचा, घरफोड्या करायचा; ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासून परराज्यातील चोराला अटक

गुगलवर उच्चभ्रू परिसर शोधायचा, घरफोड्या करायचा; ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासून परराज्यातील चोराला अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे: परराज्यांतून पुण्यात येऊन आणि ‘गुगल’वर उच्चभ्रू परिसर शोधून बंद घरे फोडणाऱ्या सराईत चोरट्याला येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. एक ना दोन तर तीनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून तेलंगणामध्ये जाऊन पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली. चोरट्याने येरवडा आणि चतृ:शृंगी परिसरात तीन घरफोड्या करून ६० लाखांचा ऐवज लंपास केला. त्याच्या विरोधात हैदराबाद आणि तिरुपती पोलिस ठाण्यांत पंचवीस गुन्हे दाखल आहेत.

‘नरेंद्र बाबू नुनसावत (वय २७, रा. मीर पेठ, हैदराबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार सतीश बाबू करी (वय ३५, रा. हैदराबाद) असे फरार आरोपीचे नाव आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘कल्याणीनगरमध्ये ऑक्टोबरमध्ये बंद बंगला फोडून दहा लाखांचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारण्यात आला होता. पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास सुरू असताना महिन्याभराने चतृ:शृंगीतील दोन घरफोड्यांत ५० लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. येरवडा पोलिसांनी शहरातील ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तेलंगणमध्ये जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या,’ असेही बोराटे म्हणाले.

सहायक आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, अमजद शेख, अनिल शिंदे, प्रशांत कांबळे, किरण घुटे, सूरज ओंबासे आणि सागर जगदाळे यांनी कामगिरी केली.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

चकवा देण्यासाठी पाच रिक्षा बदलल्या

पुण्यात आल्यावर आरोपी स्वारगेटमधील हॉटेलमध्ये थांबले. स्थानिक पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने शोध घेतील, असा संशय आल्याने कल्याणीनगरमध्ये घरफोडी केल्यानंतर आरोपी थेट हॉटेलवर न जाता भारती विद्यापीठात गेले. त्यासाठी त्यांनी पाच रिक्षा बदलल्या. तेथीन आरोपी हॉटेलला गेले आणि त्यांनी तेलंगणला पोबारा केला. घरफोडी करण्यासाठी येण्यापूर्वी आरोपी दोन दिवस आधी मोबाइल बंद करीत होते.

Nagpur Accident: नागपुरात लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात, सहाजणांचा दुर्दैवी मृत्यू
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed