मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी २४ डिसेंबरची डेडलाइन दिलेली आहे. आरक्षणाचं काय होतंय, सरकार काय निर्णय घेतं ते पाहुया, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
संसदेत दुर्दैवी घटना घडली आहे. संसदेत अनेक जण असतात,कुठलीही वास्तू असेल तिकडे सुरक्षा असली पाहिजे.आम्हाला कळलंच नाही,पण ती तरुणी बेरोजगारीबाबत पोटतिडकीने बोलत होती. त्यामुळे आता तपास होईल तेव्हा सगळ्या गोष्टी समोर येतील, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात संपूर्ण गृह खातं अपयशी ठरलेलं आहे. सरकार या प्रकरणात काहीच करत नाही, देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री काय करतात, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला.
महाराष्ट्र सरकार काय करतंय, असा सवाल देखील सुप्रिया सुळेंनी केला. अधिवेशनात लोकांची कामं होत नाहीत. इथेनॉल बाबत असेल, शेतीमालाला भाव असेल, काय चाललंय आपण पाहतोय,कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासंदर्भात दिल्लीत बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाणार आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.