पुणे (खेड) : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण परिसरातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका २५ वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. आकाश बापू बनसोडे (वय २५) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रथमेश उर्फ बाळू फड, सम्यक दिलीप गणपिर, भीमराज मारुती कांबळे आणि एक विधिसंघर्षत बालकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आकाशचा भाऊ सागर बापू बनसोडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळत असताना फिर्यादीचा भाऊ आकाश याने आरोपींना शिवीगाळ केल्याने त्यांच्यात भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग काढण्यासाठी त्यांनी आकाश याच्यावर लाकडी दांडक्याने आणि कोयत्याने डोक्यावर, हातावर वार केले. त्यानंतर आकाशने तिथून पळ काढला. मात्र, आरोपींनी त्याच्यावर पळत जाऊन वार केले आणि त्याची खून केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. चाकण शहर व परिसरात खुनाच्या बऱ्याच गंभीर घटना मागील काही दिवसात समोर आल्या आहेत. त्यात बऱ्याच अशा गुन्ह्यात अल्पवयीन आरोपींचा सहभाग दिसून आला आहे. मुबलक आर्थिक सुबत्ता, अर्धवट शिक्षण, मुलांच्या वाईट कृत्याकडे दुर्लक्ष अशा एक ना अनेक गोष्टींमुळे अशा गोष्टी या परिसरात वाढताना दिसत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.