• Sat. Sep 21st, 2024

गेल्या सहा महिन्यांत २६७ बालकांनी गमावले प्राण, त्यातही अर्भकांचे प्रमाण सर्वाधिक, कारण काय?

गेल्या सहा महिन्यांत २६७ बालकांनी गमावले प्राण, त्यातही अर्भकांचे प्रमाण सर्वाधिक, कारण काय?

नाशिक: बालमृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी जिल्ह्यातील बालमृत्यूंची आकडेवारी चिंताजनक आहे. जिल्ह्यात सहा महिन्यांत तब्बल २६७ बालकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. शून्य ते एक वर्षाची २२४ अर्भके आणि एक ते पाच वर्षांपर्यंतच्या ४३ बालकांचा त्यात समावेश आहे.

आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सधन मानल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर, निफाड, नाशिक, दिंडोरीसारख्या तालुक्यांत होणारे बालमृत्यू चिंता वाढविणारे ठरले आहेत. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. राज्यासह जिल्ह्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत.

गर्भवतींना पोषण आहार, नियमित तपासणीसह अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र, तरीही जिल्ह्यातील बालमृत्यू घटत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. कुपोषण, कमी वजनाची बालके, तसेच अन्य विविध कारणांमुळे बालकांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहेत. गत एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत २६७ बालकांच्या मृत्यूची नोंद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आहे. मृत्यू झालेल्या बालकांमध्ये १५९ मुलांचा, तर १०८ मुलींचा समावेश आहे. बालमृत्यूंची ही सर्व आकडेवारी एप्रिल ते सप्टेंबरअखेरपर्यंतची आहे.

वयोगटनिहाय झालेले बालमृत्यू

जन्मानंतर २८ दिवसांच्या आत : १७९

२९ दिवस ते १ वर्ष : ४५

१ वर्ष ते ५ वर्षे : ४३

मृत्यूचे कारण आणि संख्या

कमी वजनाची, लवकर जन्मलेली बालके : ५६

जंतुसंसर्ग : ४३

जन्मत:च श्वास घेण्यास त्रास : ४१

इतर आजार : ३३

श्वसननलिकेचे आजार : २९

जन्मत:च असलेले व्यंग : २४

न्यूमोनिया : २१

अपघात : ७

पाण्यात बुडून : ५

विषबाधा : ५

विनाकारण मृत्यू : १

मेंदूज्वर : २

इतर आजार : ३३

तालुकानिहाय बालमृत्यू

तालुका संख्या

त्र्यंबकेश्वर ४१

निफाड २८

सुरगाणा २८

इगतपुरी २७

दिंडोरी २४

नाशिक २३

पेठ २२

येवला १७

कळवण १४

चांदवड १३

सिन्नर १२

बागलाण ९

मालेगाव ४

नांदगाव ३

देवळा २

ना तेजस्वी प्रकाश, ना स्वर्ग, मृत्यूनंतर नेमकं काय होतं? २४ मिनिटं मृतावस्थेत राहिलेल्या महिलेने सगळंच सांगितलं
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed