• Mon. Nov 25th, 2024
    अभियांत्रिकीचा पेपर समाज माध्यमावर व्हायरल; परीक्षा केंद्र रद्द केलं, दोघांवर गुन्हा दाखल

    छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पेपर फुटी प्रकरणी नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले आहे. दुपारी २ वाजताचा पेपर सव्वा एक वाजता सोशल माध्यमावर उपलब्ध झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली. या प्रकरणी परीक्षा केंद्र रद्द करत प्राचार्य डॉ. एम. भास्करराव, परीक्षा प्रमुख समन्वयक डॉ. ए. बी. चाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले. संबंधित सिव्हील अभ्यासक्रमाचा रद्द झालेला पेपर पुन्हा घेण्यात येणार आहे.
    आता रॅगिंग प्रकरणी संस्थाप्रमुखांना जबाबदार धरणार; विद्यापीठ अनुदान आयोगाने बजावलं
    विद्यापीठातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १२ डिसेंबरपासून सुरु झाल्या आहेत. परीक्षेत सिव्हील अंतिम वर्षाचा डिझाईन ऑफ स्ट्रक्चर (थ्री) हा पेपर दोन वाजता सुरू होणार होता. संबंधित पेपर समाजमाध्यमावर लिंक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कुलगुरू डॉ. येवले यांनी दखल घेऊन परीक्षा विभागास चौकशीचे आदेश दिले. संबधित प्रश्नपत्रिका परळी येथील नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केंद्रावरुन १ वाजून ८ मिनिटे आणि २२ सेकंदांनी ’डाऊनलोड’ करण्यात आली. तर १ वाजून ११ मिनिटांनी हा पेपर समाज माध्यमांवर व्हायरल झाला. ही माहिती समजताच कुलगुरू डॉ. येवले यांनी संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. भास्करराव, परीक्षा प्रमुख समन्वयक डॉ. ए. बी. चाटे यांच्या विरोधात पोलीसात ‘एफआयआर’ दाखल करण्याचे आदेश परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. भारती गवळी यांना दिले. यासह पेपर ही रद्द करण्यात आला आहे. त्यासह परळी येथील हालगे महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले.

    विद्यापीठाशी संलग्नित नागनाथअप्पा हालगे आभियांत्रिकी महाविद्यालय परळी वैजनाथ, आयसीईम व एवरेस्ट महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर) व के. टी. पाटील महाविद्यालय धाराशिव हे चार केंद्र असून एकूण ७९ विद्यार्थी परीक्षेस आहेत. संबधित विषयाचा रद्द झालेला पेपर नंतर घेण्यात येणार आहे. त्याचे वेळापत्रक लवकरच कळविण्यात येईल, असे अधिकारी सुत्रांनी सांगण्यात आले. हालगे महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातील सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे स्थालंतर करण्यात येणार असून इतर परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

    गाढ झोपत असताना कालवा फुटला, राहुट्या वाहून गेल्या; ऊसतोड कामगारांचा संसार बुडाला

    आभियांत्रिकी परीक्षेतील हा गैरप्रकार विद्यापीठ प्रशासन अजिबात खपवून घेणार नाही. परीक्षेतील गैरप्रकरणी संबधित महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले. जवळच्या केंद्रावर परीक्षा केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांचे स्थालंतर करण्यात येईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed