• Mon. Nov 25th, 2024
    क्लासबिसची भानगड नाय, चौघांचा एकत्र अभ्यास, अखेर यशाने पिंगा घातला, MPSC परीक्षेत चमकले

    नांदेड : जिद्द आणि मेहतीच्या बळावर यश मिळवता येतं. मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेण्याची गरज देखील नसते. असचं काहीस करुन दाखवलं आहे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील चार तरुणांनी. कुठलाच क्लास न लावता केवळ जिद्दीच्या बळावर तालुकास्थळी राहून चार मित्रांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. तिघांची कर सहाय्यक तर एकाची सहकार विभागात सहाय्यक सहकार अधिकारी पदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे ही चारही तरुण मध्यमवर्गीय आणि शेतकरी कुटुंबातील आहेत.

    सचिन मारोती कडलवार, श्याम मलकन्ना भंडरवार, नागेश यल्लप्पा निलमवार आणि राहुल शंकर गुडलावार असं यश मिळवलेल्या तरुणांचं नाव आहे. हे सर्व तरुण देगलूर येथील रहिवासी आहेत. घरची परिस्थिती हलाखीची आहे. काही तरुणांचे पालक मोजमजुरी तर काहींचे शेती करतात. हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत या चार ही मित्रांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. अनेकजण स्वप्न साकारण्यासाठी मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहराला प्राधान्य देत असतात. पण या चार मित्रांनी देगलूरमध्ये राहून स्पर्धा परीक्षा देण्याचा निश्चय केला.
    दंगलखोरांना रोखण्यात पोलीस कमी पडले, गृहमंत्री फडणवीस यांची विधानसभेत कबुली
    देगलूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्रात जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे. सहा – सहा तास अभ्यास देखील करायचे. तसेच आपल्या कुटुंबियांना कामात हातभार देखील लावायचे. याच अभ्यास केंद्राचा त्यांना फायदा झाला आणि नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेत ते चौघे उत्तीर्ण झाले. सचिन कडलवार हा सहकार विभागात सहाय्यक सहकार अधिकारी तर श्याम भंडरवार, नागेश निलमवार आणि राहुल गुडलावार यांची कर सहाय्यक पदी निवड झाली आहे.

    हलाखीच्या परिस्थितीवर मात करत या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी मिळवलेलं यश हे ग्रामीण विभागातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. देगलूर नगर पालिकेच्या वतीने गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र सुरु करण्यात आलं आहे. या अभ्यासिका केंद्राचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा देखील होत आहे. अनेकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र सार्थक ठरत आहे.

    घर सोडण्याची वेळ आलीय! लोकसभेत घुसणाऱ्या तरुणाची सीक्रेट डायरी पोलिसांच्या हाती

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *