• Mon. Nov 25th, 2024
    परवानगी नाही दिली तरी मोर्चा निघणारच, उद्धव ठाकरेंसह धारावी बचाव समिती आपल्या भूमिकेवर ठाम

    मुंबई : धारावी पुनर्विकासाचे अदानी यांना दिलेले कंत्राटी रद्द करण्याची मागणी करत उद्धव ठाकरे मोर्चा काढणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर धारावीतील पुनर्विकास समिती आणि धारावी बचाव समिती यांनी पत्रकार परिषद घेत एकमेकांवर आरोप केले आहेत. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी अजूनही मोर्चाला परवानगी दिली नाही. त्यावरून धारावी बचाव समितीने सरकारला इशारा दिला आहे.

    धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट अदानी समूहाला देण्यात आले आहे. त्यातच अदानींना सरकारने TDR मध्ये सवलत दिली आहे. या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी आदानींच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. मात्र या मोर्चाला शुक्रवारी ४ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही. त्याबाबत धारावी बचाव समितीने पत्रकार परिषद घेत सरकारला इशारा दिला आहे.

    पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नाही तरी आम्ही मोर्चा काढणारच असा इशारा धारावी बचाव समितीने दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या काळात ४०० स्क्वेअर फुटांचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र त्यावेळी SRA कडून इतर विकासकांना सवलती दिल्या जात नव्हत्या. पण आता सरकारने एवढ्या सुविधा आणि सवलती अदानी यांना दिल्या आहेत. त्यामुळे धारावीकरांना ५०० स्क्वेअर फूट घरं देण्याची मागणी करण्यात आली आहे.

    नववर्षी डबलडेकरची भेट, प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार, १० इलेक्ट्रिक बस नवी मुंबई परिवहनच्या ताफ्यात
    काय आहे धारावी बचाव समितीच्या मागण्या?

    धारावीचा विकास व्हावा मात्र हा पुनर्विकास अदानी यांच्या कंपनी ऐवजी म्हाडा या सरकारी यंत्रणेमार्फत करावा.
    धारावीतील प्रत्येक झोपडी धारकाला ५०० स्क्वेअर फुटाचे घर धारावीतच देण्यात यावे.
    धारावीत ज्यांचे व्यवसाय आहेत. त्यांना धारावीतच सध्याच्या जागेच्या प्रमाणात घर देण्यात यावे.
    धारावीतील कुंभारवाडे आणि इतर महत्त्वाच्या जागेवर असलेले व्यवसाय कायम ठेवण्यात यावेत.
    धारावीचे फेर सर्वेक्षण करण्यात यावे. त्यानुसार घर देण्यात यावे.

    पुतण्याच्या पाठीशी काकू खंबीरपणे उभी, दिशा सालियनच्या मृत्यूच्या आरोपांवरून शर्मिला ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
    धारावी पुनर्विकास समितीचा थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

    धारावी पुनर्विकासाला अडथळा निर्माण करून धारावीचा विकास अडवून धरण्याचे काम उद्धव ठाकरे आणि आमदार वर्षा गायकवाड यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप धारावी पुनर्विकास समितीने केला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या काळात धारावीतील नागरिकांना ४०० स्क्वेअर फुटांचे घर देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता. मात्र आता तेच उद्धव ठाकरे ५०० स्क्वेअर फुटांची मागणी करत असल्याचा आरोप धारावी पुनर्विकास समितीने केला आहे. तसेच धारावी पुनर्विकास समिती ही धारावीच्या विकासाच्या बाजूने असून आम्ही या मोर्चात सहभागी होणार नसल्याचे धारावी पुनर्विकास समितीने सांगितले.

    जुन्या पेन्शनबाबतच्या कर्मचाऱ्यांच्या संपाला सदावर्ते यांचा विरोध का?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *