• Thu. Mar 19th, 2026
    व्यक्तीची प्रकृती बिघडली; पत्नीने दवाखान्यात नेलं, तेवढ्यातच अनर्थ अन् कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबाचा आक्रोश

    रत्नागिरी: अलीकडे हृदयरोगाचे प्रमाण वाढले असून कामावर जाणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रत्नागिरी येथील एका आंबा बागायतदाराचाही असाच दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे. रत्नागिरी वरवडे येथील असलेले आंबा बागायतदार अविनाश अनंत विचारे (५५, राहणार वरवडे) यांना घरातच अस्वस्थ वाटू लागल्याने तात्काळ शासकीय रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. या आंबा बागायतदाराच्या मृत्यूनंतर घर संसार सांभाळण्याची मोठी जबाबदारी आता केवळ त्यांच्या पत्नीवर आली आहे.
    पंधरा मिनिटात येतो सांगून बाहेर पडला; मात्र व्यक्तीसोबत घडलं भलतच, सत्य समोर येताच कुटुंब हादरलंमिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावातील आंबा बागायतदार असलेल्या अविनाश विचारे यांना घरात असताना अचानक चक्कर आली. त्यातच त्यांना हाता पायालाही मुंग्या आल्याने त्यांच्या पत्नीने आरोग्य विभागाच्या इमर्जन्सी नंबर असलेल्या १०८ क्रमांकवर संपर्क करून तात्काळ शासकीय रुग्णवाहिका बोलावली. याच रुग्णवाहिकेतून त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तात्काळ औषध उपचारही सुरू करण्यात आले. मात्र औषध उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. हा दुर्दैवी प्रकार १३ डिसेंबर रोजी गुरुवारी सकाळी घडला आहे. सायंकाळी उशिरा यांचे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

    बीड जाळपोळ प्रकरणी अटकसत्र सुरू, फरार आरोपींचा शोध चालू, कारवाई होणारच; फडणवीसांची विधानसभेत ग्वाही

    रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावातील असलेले अविनाश विचारे हे आंबा काजू बागायतदार होते. हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि एक मुलगी असे कुटुंब आहे. आंबा बागायतदार असलेले अविनाश विचारे यांचा मुलगा इयत्ता अकरावी शिक्षण घेत आहे तर त्यांची मुलगी मतिमंद असून आता या संसाराची सगळी मोठी जबाबदारी विचारे यांच्या पत्नीवर आली आहे. या सगळ्या दुर्दैवी घटनेमुळे विचारे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अविनाश विचारे यांच्या निधनाने वरवडे परिसरातूनही हळहळ व्यक्त होत आहे. या सगळ्या प्रकरणाची नोंद रत्नागिरी जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *