• Sat. Sep 21st, 2024
संशयितरित्या उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेची झाडाझडती, तपासणीत धक्कादायक प्रकार उघड

पालघर : पालघर येथे रुग्णवाहिकेतून चक्क अवैध मद्याची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्पादन शुल्क विभागाने राष्ट्रीय महामार्गावर वाडा – खडकोना नजीक अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांवर केलेल्या कारवाई हा प्रकार उघड झाला असून या कारवाईत रुग्णवाहिकेसह दमन बनावटीचा ९ लाख ३४ हजार १२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात परराज्यातून अवैधरित्या मद्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडा – खडकोना गावाच्या हद्दीत स्वागत यूनाइटेड पेट्रोल पंपच्या पार्किंगच्या जागेत संशयितरित्या उभ्या असलेल्या एका रुग्णवाहिकेची उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तपासणी करत झाडाझडती घेतली. यात रुग्णवाहिकेची तपासणी धक्कादायक प्रकार उघड झाला.

मेडल सेरेमनी इज बॅक! भारताच्या ड्रेसिंग रूममधील स्पेशल व्हिडिओ वर्ल्डकपनंतर नव्या अवतारात, कोण ठरला बेस्ट फिल्डर?
रुग्णवाहिकेच्या मागील बाजूस बसण्याकरता तयार केलेल्या दोन लाकडी बॉक्सची आसने आणि स्ट्रेचर असल्याचे आढळून आले. बसण्यासाठी असलेले आसने आणि चालकाच्या सीटच्या मागे तयार केलेल्या कप्प्यामध्ये दमण बनावटीचा अवैध मद्यसाठा आढळून आला. या रुग्णवाहिकेतूनच छुप्या पद्धतीने अवैधरित्या परराज्यातून मद्याची वाहतूक केली जात होती. या रुग्णवाहिकेतून सात बॉक्स ८४ बाल्क लिटर दमण बनावटीचा अवैध मद्यसाठा आढळून आला. उत्पादन शुल्क विभागाने रुग्णवाहिकेसह ९ लाख ३४ हजार १२० रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी रुग्णवाहिका चालकाविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, १८ डिसेंबरला ‘या’ ५ विभागात पाणी कपात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed