• Mon. Nov 25th, 2024

    आदिवासींना हाताशी घेऊन पुष्पा स्टाईल गांजाची शेती, मुंबईत विक्री, प्रधान भावंडांना मुंबई पोलिसांकडून अटक

    आदिवासींना हाताशी घेऊन पुष्पा स्टाईल गांजाची शेती, मुंबईत विक्री, प्रधान भावंडांना मुंबई पोलिसांकडून अटक

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘पुष्पा’ चित्रपटाप्रमाणे ड्रग्ज तस्करीमध्ये विशेषतः गांजा पुरवण्यात हातखंडा असलेल्या ओडिशाचा लक्ष्मीकांत प्रधान उर्फ लक्ष्मीभाई याच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. ओडिशा, आंध्र प्रदेशच्या सीमेवर वनजमिनींवर आदिवासींकडून गांजाची शेती करून घ्यायची आणि गावकऱ्यांना पैशांचे लालूच दाखवून हा गांजा तो महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांमध्ये विकायचा, अशी या ‘पुष्पा’ची साखळी होती.

    अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने सन २०२१मध्ये सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा गांजा हस्तगत केला होता. पोलिसांनी याप्रकरणात आकाश यादव आणि दिनेशकुमार सरोज यांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीत संदीप सातपुते याचे नाव पुढे आले. मुंबई, ठाणे, विरारमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या संदीप याला पोलिसांनी पकडले. या तिन्ही आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, तिघेही सध्या तुरुंगात आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईत गांजा आणण्यात आल्याने उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर युनिटच्या प्रभारी निरीक्षक लता सुतार, सहायक निरीक्षक लोंढे, महेश भांगे, उपनिरीक्षक चिकणे, महाले, साळुंखे, जांभळे यांच्या पथकाने या तस्करीचा खोलवर तपास सुरू केला. तपासादरम्यान गांजाविक्रीतील मोठा तस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मीकांत प्रधान याचे नाव पुढे आले.

    बाईक थेट ट्रकच्या चाकात घुसली, लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवडाभरातच तरुणाचा दुर्दैवी अंत
    अमली पदार्थ विरोधी पथकाने लक्ष्मीकांतच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले. मोठे नेटवर्क, राजकीय वरदहस्त व दहशत असल्याने त्याच्याबाबत पुरेशी माहिती हाती लागत नव्हती. लक्ष्मीकांत हा त्याचा साथीदार विद्याधर प्रधान याच्यासह ओडिशा, तेलंगण, नेपाळ येथे ओळख बदलून राहत होता. त्याच्या हालचाली टिपत असतानाच तो ओडिशातील भरमपूर जिल्ह्यात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून मुंबई पोलिसांनी मोठ्या कौशल्याने सापळा लावून लक्ष्मीकांत आणि त्याचा साथीदार विद्याधर याला अटक केली.

    फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

    लक्ष्मीकांत बनला लक्ष्मीभाई

    गांजा विक्रीची टोळी चालविणाऱ्या लक्ष्मीकांत याच्यावर स्थानिक पातळीवर किरकोळ गुन्ह्यांची नोंद होती. सन २०१६पासून तो ड्रग्ज तस्करीकडे वळला. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवरील जंगलावर त्याने लक्ष केंद्रित केले. आदिवासींना हाताशी घेऊन मोठ्या प्रमाणात गांजाची शेती करण्यास त्याने सुरुवात झाली. हा गांजा स्थनिकांकडून जंगलातून बाहेर आणला जात असे. त्यानंतर हा गांजा मुंबईसह आसपासच्या शहरात आणि अनेक राज्यांत विकला जात असे. आदिवासी, ग्रामस्थ तसेच या साखळीतील सर्वांना त्याचा चांगला मोबदला मिळत होता. यातूनच लक्ष्मीकांत हा लक्ष्मीभाई बनला.

    बाईक थेट ट्रकच्या चाकात घुसली, लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवडाभरातच तरुणाचा दुर्दैवी अंत
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed