ठाणे: कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील सुधांशु चेंबरमधील तृप्ती लॉजमध्ये शनिवारी रात्री एका महिलेचा तिच्या प्रियकराने रात्रीच्या वेळेत खून करून पलायन केले होते. या प्रकरणातील आरोपीला महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने धाराशिव येथून सोमवारी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत ज्योती तोरडमल ही आपली पत्नी होती. मागील काही महिन्यांपासून आपण वेगळे राहत होतो, अशी माहिती आरोपी भूपेंद्र गिरी याने पोलिसांना दिली आहे. ज्योतीला मारण्याचे नक्की कारण काय आरोपीने सांगितले नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी सांगितले. तपासातून ही माहिती पुढे येईल. आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले आहे. त्याला न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे वपोनि साळवी यांनी सांगितले.

आरोपी गिरी शनिवारी ज्योतीला घेऊन तृप्ती लॉजमध्ये आला. तेथे त्याने कट रचून पत्नीची हत्या केली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी आपण बाजारातून काही सामान घेऊन येतो असे लॉज व्यवस्थापकाला सांगून बाहेर पडला. त्यानंतर तो परत आला नाही. सकाळी लॉजचे कामगार गिरी राहत असलेला दरवाजा ठोठावू लागले. त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या चावीने दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी ज्योतीचा खून केला असल्याचे आढळून आले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.