• Mon. Nov 25th, 2024

    करोना लस घेतलेल्या तरुणांच्या जीवाला धोका? अनेकांना शंका; ICMR संशोधन करणार

    करोना लस घेतलेल्या तरुणांच्या जीवाला धोका? अनेकांना शंका; ICMR संशोधन करणार

    मुंबई : करोना संसर्गानंतरच्या कालावधीमध्ये तरुणांचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद वाढली आहे. यामागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून तीन वेगवेगळ्या स्वरूपाचा अभ्यास करण्यात येत आहे. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घेतलेल्या लसीकरणाशी याचा संबध आहे का, याचाही अभ्यास यामध्ये समाविष्ट आहे.

    वयवर्षे १८ ते ४५ या दरम्यानच्या प्रौढांमध्ये अचानक मृत्यूशी संबंधित घटक कोणते आहेत याचा चाळीस रुग्णालये तसेच वैद्यकीय संशोधन संस्थांमध्ये अभ्यास सुरू आहे. राज्यसभेमध्ये यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आऱोग्य व कुटुंबकल्याण विभागाने ही माहिती दिली. या अभ्यासामध्ये नोंदवण्यात आलेल्या मृत्यूंच्या कारणांचे वैद्यकीय विश्लेषणही करण्यात येणार आहे. हृदयविकार तसेच आरोग्याशी संबंधित इतर आजारांसंदर्भात अभ्यास करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाकडून तांत्रिक तसेच आर्थिक सहकार्यही केले जाते. असंसर्गजन्य आजारांचा मागील काही वर्षामधील प्रादुर्भाव वाढता आहे. त्यामागील काऱणांचा राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या माध्यमातून शोध घेतला जातो.

    लोकसंख्येमध्ये संसर्गजन्य आजारांची नोंद असंसर्गजन्य आजारांच्या तुलनेमध्ये अधिक लवकर होते. मधुमेह, कॅन्सर हे आजार लोकसंख्येमध्ये किती प्रमाणात आहेत याच्या नोंदी विविध सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्यात येतात. राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अंतर्गत तीस वर्षे वयोगटापेक्षा कमी व्यक्तींचेही स्क्रीनिंग आयुष्यमान आरोग्य मंदिर या उपक्रमाच्या अंतर्गत केले जाते. आयुष्मान भारत सक्षम आरोग्य केंद्र योजनेद्वारा हृदयविकारांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण केले जात आहे.

    हृदयविकार असलेले रुग्ण विविध आरोग्यकेंद्रावर वैद्यकीय उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालये, राज्य आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे. हे उपचार विनाशुल्क असल्याचेही नमूद कऱण्यात आले आहे.
    नाशिककरांनो सावधान! डेंग्यूनंतर शहरावर झिकाचं सावट, २४ वर्षीय युवकाला लागण, काय आहे लक्षणं?
    ही काळजी घ्या

    करोनाकाळामध्ये अनेक तरुणांचे हृदयाच्या प्राथमिक आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष झाले असून तीस ते चाळीस या वयोगटामधील रुग्णांच्या चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. लक्षणे दिसल्यानंतरही अॅसिडीटीचा त्रास म्हणून दुर्लक्ष केले जाते. ही लक्षणे योग्यवेळी गांभीर्याने पाहायला हवीत, असा खबरदारीचा इशारा हृदयविकारतज्ज्ञांनी दिला आहे. कुटुंबामध्ये कुणालाही मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल असेल तर पुढच्या पिढीमध्येही हृदयविकाराचा धोका असू शकतो. योग्यवेळी चाचणी, कार्डियाक स्क्रीनिंगमुळे जीव वाचू शकतो. हृदयविकाराची शक्यता कमी करण्यासाठी हृदयासंबंधी तपासणी करून घेणे गरजेचे आहे, असे डॉ. एस. एस. पवार यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed