• Thu. Nov 28th, 2024

    कन्यादानाचं स्वप्न अधुरं! आठ दिवसांवर लेकीचं लग्न; पत्रिका घेऊन देवदर्शनासाठी निघालेल्या पित्यावर काळाचा घाला

    कन्यादानाचं स्वप्न अधुरं! आठ दिवसांवर लेकीचं लग्न; पत्रिका घेऊन देवदर्शनासाठी निघालेल्या पित्यावर काळाचा घाला

    नांदेड: आठ दिवसानंतर लेकीचं लग्न.. घरात आनंदाचा क्षण होता. लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पित्याचं लेकीचं कन्यादान करण्याचं स्वप्न होतं. मात्र पत्रिका घेऊन देव दर्शनासाठी गेलेल्या पित्यावर काळाने घाला घातला. कंटेनरच्या धडकेने दुचाकीवर असलेल्या दोघांचा मृत्यू झाला. मन हेलावून टाकणारी घटना शनिवारी दुपारी जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मानवाडी पाटीजवळ घडली.
    देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग दाखल करा, डॉ. संजय लाखेपाटलांची मागणी, वाचा नेमकं प्रकरण…
    मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानोबा माधवराव नरवाडे (५२) आणि आनंदीदास गणपत पांडे असं मृतांची नावे आहेत. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत आनंदीदास पांडे हे बाभळी येथील रहिवासी आहे. त्यांच्या मुलीचा येत्या १७ डिसेंबर रोजी विवाह ठरला आहे. पांडे कुटुंबियाकडून लग्नाची तयारी सुरु होती. पांडे हे लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी फिरत होते. त्यातच आज ते लग्नाची पत्रिका घेऊन आपले मित्र ज्ञानोबा नरवाडे यांच्या सोबत देव दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करुन परत दुचाकीने हदगांव शहराकडे येत होते. नांदेड – नागपूर महामार्गावरील मानवाडी पाटीजवळ येताच पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरच्या चालकाने निष्काळजीपणाने गाडी चालवत दुचाकीला जबर धडक दिली.

    फडणवीस या मैदानात शिवसेना मैदानात उतरलीय, राऊतांचं आव्हान

    अपघातानंतर रक्तबंभाळ झालेल्या आनंदीदास पांडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर ज्ञानोबा नरवाडे हे गंभीररित्या जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा देखील मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच हदगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगन्नाथ पवार हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. पंचनामा करुन गुन्हा दाखल केला. दरम्यान घटनेनंतर हदगाव शहरात एकच खळबळ उडाली. आपल्या लेकीचं कन्यादान करणे हे प्रत्येक वडिलांच स्वप्न असतं. मात्र लेकीचं कन्यादान करण्यापूर्वीच पित्यावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने पांडे आणि नरवाडे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed