• Mon. Nov 25th, 2024
    चिमुकली वडिलांसोबत शाळेत निघाली; मात्र वाटेतच नियतीनं डाव साधला, कुटुंबाच्या आक्रोशानं मन सुन्न

    जळगाव: जिल्ह्यातील पहूर (ता. जामनेर) येथे शाळेत जात असलेल्या पितापुत्री यांच्या सायकलला भरधाव आयशर वाहनाने मागून जोरात धडक दिल्याने बाप-लेक गंभीर जखमी झाले. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.८) सकाळी पहूर बसस्थानकाजवळ घडली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला होता. ज्ञानेश्वरी शंकर भामरे (११) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
    आधी रस्त्यात अडवलं; नंतर मारहाण अन् भरचौकात तरुणाला संपवलं, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
    मिळालेल्या माहितीनुसार, शंकर भामेरे पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आहेत. ज्ञानेश्वरी डॉ. हेडगेवार विद्यालयात पाचव्या वर्गात शिकत होती. जळगावात होणाऱ्या कुमार साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी आज जळगावात निवड फेरी होती. त्यासाठी ज्ञानेश्वरीला स्वत: लिहलेल्या कविता सादर करण्यासाठी जळगावात यायचे होते. तिला वडील शंकर भामरे सायकलने पहूर बसस्थानकावर घेऊन येत होते. स्थानकाजवळ असणाऱ्या नाल्याजवळ बांधकाम सुरु आहे. तेथे कच्च्या रस्त्यावर जात असताना मागून येणारी भरधाव आयशरने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात शंकर भामरे आणि त्यांची कन्या ज्ञानेश्वरी रस्त्यावर फेकले गेले.

    जखमी ज्ञानेश्वरी आणि शंकर भामरे यांना नागरिकांनी तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ज्ञानेश्वरीला मयत घोषित केले. तर जखमी वडील शंकर भामरे यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान आयशर चालक सुनिल ज्ञानदेव सोनवणे (रा. अंजनवटी ता. जिल्हा बीड) यास पहूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन करून सायंकाळी शोकाकुल वातावरणात ज्ञानेश्वरी भामरे हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    इकबाल मिर्चीसोबत संबंध, ईडीची कारवाई, तरीही पटेल पंगतीत चालतात; पटोलेंची फडणवीसांवर टीका

    दरम्यान या अपघातामुळे पहूर येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या वाघूर नदीवरील पुलाचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याची अवस्था अतिशय गंभीर असून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघातही दररोज होत आहेत. रस्त्याचे काम त्वरित व्हावे, यासाठी पहूर येथील संतप्त ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पहूर बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed