म.टा. प्रतिनिधी, नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवसेनेप्रमाणेच फूट पडल्यानंतर हिवाळी अधिवेशनात विधीमंडळ परिसरातील पक्षाचे कार्यालय नेमके कोणत्या गटाकडे जाईल याची उत्सुकता निर्माण झाली असताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आम्हीच ओरिजनल राष्ट्रवादी असल्याने कार्यालय आमच्याकडेच असल्याचा दावा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांचे याठिकाणी स्वागतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अधिवेशनापूर्वीच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने विधीमंडळातील परिसरातील कार्यालयावर दावा केला आहे. दरम्यान बुधवारी विरोधकांचा पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांना यासंबंधी विचारले असता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही. त्यामुळे पक्ष कार्यालयासंबंधी विधानसभा अध्यक्षांना अर्ज करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी इतरांनी यासंबंधी त्यांना पत्र पाठवले असेल तर त्याची कल्पना नाही. त्यामुळे विधीमंडळ परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यालय आमचेच असल्याचा दावा पाटील यांनी यावेळी केला.

यावेळी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंबंधी निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. यात आमच्या वकिलांकडून पक्षात कुठलाही वाद नाही असा युक्तीवाद करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणाला कार्यालय देण्यात आले असेल तर विधानसभा अध्यक्षांची ही कृती पूर्वग्रह दुषित भावनेतून केल्यासारखे होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सरकारमध्ये गेलेल्यांपैकी कोणीही या कार्यालयात आले तर आम्हाला काहीच हरकत नाही असेही पाटील यावेळी म्हणाले.