रत्नागिरी : कोकणातील प्रस्तावित असलेल्या रिफायनरचा विषय सध्या पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात आम्हाला निवेदन देण्यापासून रोखले असा आरोप रिफायनरी विरोधकांनी केला होता. अशातच आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माती परीक्षणाचा अहवाल आल्यानंतरच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पुढे नेला जाईल, असं सांगत केवळ मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका करून स्वतःच अस्तित्व निर्माण करणे असे कोणी करू नये अशा शब्दात सामंत यांनी सुनावले आहे. रिफायनरीच्या प्रकल्पस्थळी माती परिक्षण करून आता सुमारे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे मात्र अजूनही हा अहवाल आलेला नाही. त्यामुळे अहवाल कधी होणार, या प्रकल्पाचं नेमकं भवितव्य काय? या सगळ्याची थेट उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत, त्यामुळे याविषयी संभ्रम कायम आहे.
कातळ शिल्प वगळूनच रिफायनरी प्रकल्प होईल असे अनेकदा अनेकदा पालकमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. माती परीक्षणाचा अहवाल आला असेल तर मला कल्पना नाही पण हा रिपोर्ट आल्यानंतरच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पुढे जाईल. सॉईल टेस्टिंग लॅब ही कंपनीची लॅब आहे, ती इंटरनॅशनल लॅब आहे. त्यामुळे हा रिपोर्ट कधी येईल याची मला कल्पना नाही. सात महिने इतका कालावधी माती परिक्षणासाठी लागत नाही असे पत्रकारांनी सांगताच, त्यांच्याकडे कदाचित रिपोर्ट पण आला असेल मला कल्पना मला नाही. तो रिपोर्ट आला की आपण या विषयात पुढे जाणार आहोत, कोणावरही जबरदस्ती करून आपल्याला हा प्रकल्प करायचा नाही तर सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे घेऊन जाणार आहोत, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

मुंबई येथील धारावी झोपडपट्टी पुनर्वसन विषयी बोलताना ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षे त्यांना जे जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आता अजितदादा पवार या सरकारने या झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याचा अत्यंत चांगला व पारदर्शक निर्णय घेतला आहे. मात्र याला विरोध करून शंका घेऊन एका अर्थाने काँग्रेसचा अजेंडा चालवणं असाच आहे, अशा शब्दात त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन विषयाला विरोध करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला.