मध्यरात्रीपर्यंत मुलं जागतात, झोपेच्या गणितानुसार शाळांच्या वेळा बदलाव्या, राज्यपालांची सूचना
‘बदलत्या जीवनशैलीनुसार सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीपर्यंत मुले जागीच असतात. परंतु, शाळांसाठी त्यांना लवकर उठावे लागते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप चांगली व्हावी या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा,’ अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात केली.