• Sat. Sep 21st, 2024
विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वाहनाचा अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू, वीस भाविक जखमी

सोलापूर: तुळजापूर अक्कलकोट येथील देव दर्शनानंतर पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेल्या परभणी येथील भाविकांच्या गाडीचा अपघात झाला आहे. सोलापूर पंढरपूर मार्गावर असलेल्या तुंगत (ता. पंढरपूर) येथे मंगळवारी सकाळी अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू तर २० जण जखमी झाले आहेत. तुळजाभवानी स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाताना अपघात झाला आहे.
सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात; ५ म्हशींचा मृत्यू, शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथून २३ भाविक तुळजापूर, अक्कलकोट येथील देवाचे दर्शन घेऊन पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी जात होते. भाविकांचे वाहन तुंगत येथील वळणावर आले असता वाहन चालकाला वळणाचा अंदाज आला नाही. यामुळे वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. यामुळे वाहनातील चिमाजी दिगंबर शेम्बुले (४०, रा. सायाळा, ता. पालम, जि. परभणी) यांचा मुत्यू झाला आहे.

अडीच वर्ष घरात बसणाऱ्यांना काय कळणार ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे महत्त्व : एकनाथ शिंदे

विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले जवळपास वीस भाविक जखमी झाले आहेत. यामध्ये मुजाजी प्रभाकर नवघरे, कैलास तुकाराम आव्हाड, महारुद्र लक्ष्मण आव्हाड, भरत महादेव आव्हाड, गुणाजी मारुतीराव नवघरे, लक्ष्मण रामचंद्र चवरे, अंगद प्रल्हाद नवघरे, एकनाथ देवराव भुमरे, विलास लक्ष्मण नारले, विलास माणिक नवघरे, लक्ष्मण हरीभाऊ नवघरे, विलास साहेबराव डोंगरे, बळीराम बालाजी नवघरे, करण मोतीराम नवघरे मंचक ज्ञानुजी चावरे, खंडू दिगंबर मोटे, भागवत रुस्तूम नवघरे, अंगद पुंडलिक चवरे, नितीन विकास डोंगरे, गजानन केशव चवरे (सर्व रा. सायला, ता. पालम, जि. परभणी) हे भाविक जखमी झाले आहेत. या प्रकरणी प्रल्हाद विठ्ठल नवघरे (रा. सायाळा, ता. पालम, जि. परभणी) चालका विरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed