• Sat. Sep 21st, 2024

आम्ही उघडपणे हिंदुत्वाचा प्रचार करू, आम्हाला रोखू नका, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा

आम्ही उघडपणे हिंदुत्वाचा प्रचार करू, आम्हाला रोखू नका, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बजरंग बली की जय’ म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात ‘रामल्लाचे दर्शन मोफत घडवू’ अशी ऑफर मतदारांना दिली होती. आचारसंहिता भंग म्हणून निवडणूक आयोग यावर काहीच कारवाई का करत नाही? आम्ही याचा अर्थ काय लावायचा? देवाच्या आणि धर्माच्या नावाने मतं मागायला तुमची काहीच हरकत नाही, असं आम्ही मानू का? त्याला तुमची काहीच हरकत नाही किंवा त्यास तुमची मान्यता आहे असं मानून आम्ही आगामी निवडणुकीत उघडपणे हिंदुत्वाचा प्रचार करू का? असा जळजळीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला.

मुंबईतील नरीमन पॉईंट येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ‘शिवालय’ या कार्यालयाचं नुतनीकरण करण्यात आलं आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या प्रचार पद्धतीवर आक्षेप नोंदवताना निवडणूक आयोगाला सवाल केले.

निवडणूक काळात विरोधकांवर धाडी टाकल्या, प्रचाराला खीळ बसवली, मोदी-शाहांसोबत तपास यंत्रणांचं देखील अभिनंदन : संजय राऊत
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा घेतला, राम मंदिराचा मुद्दा घेतला तर त्यांच्यावर सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली. ही कारवाई कमी होती की काय म्हणून त्यांनी बाळासाहेबांचा मतदानाचा मूलभूत अधिकारही काढून घेतला. मग मला निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचा आहे की कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बजरंग बली की जय’ म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात ‘रामल्लाचे दर्शन मोफत घडवू’ असं जाहीर केलं आहे. निवडणूक आयोग यावर काहीच कारवाई का करत नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

बारामतीत लोकसभेला पवार विरुद्ध पवार सामना होईल का? शरद पवारांचं ‘लोकशाही’वादी उत्तर
पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान गृहमंत्री अमित शाह यांच्या मोफत रामलल्ला दर्शनाच्या ऑफरवरून मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. निवडणूक आयोगाने माझ्या पत्रास उत्तर दिलं नाही याचा अर्थ आम्ही काय मानायचा? होय! देवाच्या आणि धर्माच्या नावाने मतं मागायला तुमची काहीच हरकत नाही का? असा सवाल करून आम्ही आगामी निवडणुकीत ‘जय भवानी… जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करून प्रचार करू. हिंदुत्वाचे प्रश्न उघडपणे मांडू, त्यावेळी तुम्ही आमच्यावर कारवाई करू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : आताचं घटनाबाह्य सरकार म्हणजे, दुष्काळातला तेरावा महिना, एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed