• Sat. Sep 21st, 2024
Buldhana Accident: एसटी बस-मालवाहू वाहनाची जोरदार धडक, भीषण अपघात चालक गंभीर, विद्यार्थीही जखमी

बुलढाणा: बुलडाणा जिल्ह्यातील लाखनवाडा ते उदयनगर दरम्यान पिंप्री कोरडे नजिक आज,५ डिसेंबरच्या सकाळी भीषण अपघात झाला. एसटी बस आणि छोट्या मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक झाली यात दोन्ही चालक गंभीर जखमी असून बस मधील शाळकरी विद्यार्थ्यांसह काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, खामगाव आगाराची बस लाखनवाड्यावरून उदयनगरकडे जात होती. यावेळी बसमध्ये एकूण ४७ प्रवाशी होते. त्यामध्ये २० पासधारी शाळकरी विद्यार्थी होते. पिंपरी कोरडे गावानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाची आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर बस रस्त्याच्या खाली गेली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. एसटी बसच्या चालकाला अधिक मार लागला असून काही प्रवाशी किरकोळ जखमी आहेत. बसचालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मिट्ट अंधारात मुलगी ४० फूट खोल पाण्याच्या टाकीत पडली; फायर ब्रिगेडच्या जवानांमुळे जीवदान
पुण्यात स्कूलबस झाडावर आदळली

पुण्यातील वाघोली येथील शाळेची विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूलबस झाडावर आदळून सकाळी अपघात झाला. वाघोली येथील रायझिंग स्टार या शाळेतची ही बस आहे. अपघातात काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत

वारंवार एसटीच्या नादुरुस्ती व देखभालीमुळे फक्त सवलतींच्या सपाटा पाई लालपरीवर वारंवार अपघाताचे संकट वाढवत आहे का? हा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. कारण मागील काही दिवसांपासून एसटी बसेसच्या अपघात झाल्यानंतर त्या मुख्यतः देखभाली बाबत दुर्लक्ष केले जात आहे असं निदर्शनास येते. त्यामुळे नुसतं प्रवासांच्या सवलतीच्या सपाट्यापेक्षा त्यांच्या सुरक्षित कडे व सुरक्षित प्रवास कसा होईल याकडे विभागाने लक्ष देणे आवश्यक आहे अशी प्रवाशांची मागणी आहे.

रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक विभागाचा अनोखा उपक्रम; वाहनचालकांना समजावण्यासाठी थेट यमराज रस्त्यावर

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed