पुणे : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या ( दि.५) रोजी खंडाळा हद्दीत दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ITMS प्रोजेक्ट अंतर्गत खंडाळा हद्दीत किमी ५०/००० व किमी ४७/१२० या ठिकाणी गँट्री बसविण्यात येणार आहे. त्यामुळे हा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या यावेळेत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. जड-अवजड वाहने ही उर्से टोल नाका या ठिकाणी तसेच शोल्डर लेनवर थांबविण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. फक्त कार साठी किमी ५५ लोणावळा एक्झिट येथून जुना पुणे मुंबई महामार्ग – अंडा पॉईंट मार्गे मुंबई बाजूकडे वाहतूक सुरू राहणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी याची नोंद घ्यावी. हा महामार्ग पुणे आणि मुंबई तील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अनेक प्रवासी नागरीक या मार्गावर दररोज ये जा करत असतात. आठवड्याचा दुसरा दिवस असल्यानं द्रुतगती महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते. या दरम्यान मंगळवारी दोन तासांचा ब्लॉक घेतल्याने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांनी ब्लॉकच्या वेळा पाहून प्रवासाचं नियोजन करावं.
गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर ग्रँटी बसवण्यासाठी ब्लॉक घेतला जात आहे. त्यामुळे प्रवासी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या ब्लॉकमुळे दुपारच्या वेळी महामार्गावर वाहनांची गर्दी होणार आहे. त्यामुळे या वेळेत प्रवाशी नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यातून मुंबईला जाणाऱ्यांनी सकाळी लवकर निघाल्यास ब्लॉक सुरु होण्यापूर्वी मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होणं फायद्याचं ठरेल. Read Latest