• Mon. Nov 25th, 2024
    ओव्हरटेक करताना बाईक घसरली, भीषण अपघातात ट्रक अंगावरुन गेली; १९ वर्षीय तरुणीचा करुण अंत

    सातारा : सातारा – कोरेगाव रस्त्यावर संगमनगरजवळ आयशर ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून एका १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. दिशा उदय घोरपडे (वय १९, मूळ रा. शिरढोण, ता. कोरेगाव, सध्या रा. सदर बझार सातारा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचं नाव आहे. दिशा साताऱ्यातील यशोदा शिक्षण संस्थेमध्ये फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. तिचे आई-वडील शिक्षक असून तिला एक बहीण आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा घोरपडे ही शनिवारी सोनगाव (ता. सातारा) येथे मामाकडे गेली होती. रविवारी सकाळी ती दुचाकीवरून साताऱ्याकडे यायला निघाली होती. सातारा उपनगरातील संगमनगरजवळ आल्यानंतर ट्रकला ओव्हरटेक करून ती पुढे गेली. मात्र, तिची दुचाकी अचानक घसरल्याने ती ट्रकखाली सापडली. त्यामुळे ट्रकचे पुढील चाक तिच्या डोक्यावरून गेले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळाचे चित्र विदारक होते. छिनविच्छिन्न मेंदू आणि रक्ताचा सडा पडला होता. कोरेगाव-सातारा रस्त्याचे गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे.

    २०१८ ला भाजपचा ३ राज्यात पराभव आणि लोकसभेला विजय, आत्ता काँग्रेसचा ३ राज्यांत पराभव, लोकसभा नक्की जिंकू : नाना पटोले
    या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवालदार कारळे आणि हवालदार धनाजी यादव हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. या अपघामुळे वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी त्यांनी पूर्ववत केली. या अपघाताची माहिती मृत दिशा घोरपडे हिच्या आई-वडिलांना समजल्यानंतर दोघेही सिव्हिलमध्ये आले. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी प्रचंड आक्रोश केला. त्यांनी केलेला आक्रोश अक्षरश: काळीज पिळवटून टाकणारा होता. मृत तरुणीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. शवविच्छेदन करून उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

    भाजपचा तीन राज्यात अभूतपूर्व विजय, लोकसभेला आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार, देवेंद्र फडणवीसांना फुल्ल कॉन्फिडन्स

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed