• Fri. Nov 15th, 2024
    बालगृहात मुलीने मोबाइल मागितला; सिस्टर संतापली, आधी पालकांविषयी अपमानजनक बोलणं, नंतर धक्कादायक कृत्य

    छत्रपती संभाजीनगर: बालगृहात असलेल्या १६ वर्षीय मुलीने आपल्या आत्याशी बोलण्यासाठी सिस्टरकडे मोबाइल मागितला. मोबाइल मागितल्याच्या कारणावरून सिस्टरने मुलीला मारहाण केली. या घटनेप्रकरणी १६ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून बालगृहाच्या सिस्टरच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    आजीच्या प्रयत्नांना यश; निवृत्तीवेतन पदरात पडले, ८३ वर्षीय महिलेने मानले मटाचे आभार
    या प्रकरणी छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छावणी पोलीस ठाण्यात तक्रार देणारी १६ वर्षीय मुलगी २५ एप्रिल २०२१ ला दाखल झाली होती. बालगृहात असलेल्या मुलीने २७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.१५ वाजेच्या दरम्यान तेथे कार्यरत असलेलया सिस्टर यांना तिच्या आत्यासोबत बोलण्यासाठी मोबाइल मागितला. या सिस्टरने मोबइल दिला नाही. सिस्टरने मुलीचे पाणी फेकून तिच्या आई वडिलांबाबत अपमानजनक बोलले. यानंतर सदर सिस्टरने १६ वर्षी मुलीला बालगृहाची गॅलरी घासण्याचा आदेश दिला. ‘जर तू गॅलरी घासली नाही, तर तुला दुपार आणि रात्रीचे जेवण देणार नाही,’ असे स्पष्ट सांगितले.

    झालं ते झालं, हा सगळा वाद संपेल; राजेश टोपे आणि बबनराव लोणीकरांच्या वादात अर्जुन खोतकरांची मधस्थी

    यानंतर सिस्टरने १६ वर्षीय मुलीचे केस धरून ओढून खाली पाडले. १६ वर्षीय मुलीच्या लहान बहिणीने तिला उचलले असता तिला आणि मुलीच्या एका आणखी मैत्रीणीला लिंबाच्या काडीने मारहाण केली. या मारहाणीनंतर मुलींना जेवणही दिले नाही. ही घटना २७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर काळात घडली. या प्रकरणी १६ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या बालगृहाच्या सिस्टरच्या विरोधात छावणी पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात १६ वर्षीय मुलीने मोबाइल मागितल्याच्या कारणावरून तिला सिस्टरने मारहाण केली; तसेच तुम्ही सर्वजणी माझ्या विषयी गप्पा मारतात का? असे सांगून, या मुलींचे फोटो काढले. तुमचे फोटो सगळीकडे दाखविते, असे सांगून शिवीगाळ केली. तसेच तुझी आत्या भिकारी आहे, असे सांगून अपमान केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed