• Fri. Nov 15th, 2024

    प्रज्ञानंदपाठोपाठ बहिणीचीही ‘ग्रँडमास्टर’ चाल; बुद्धिबळाच्या इतिहासात ग्रँडमास्टर बनणारे पहिलेच भाऊ-बहीण

    प्रज्ञानंदपाठोपाठ बहिणीचीही ‘ग्रँडमास्टर’ चाल; बुद्धिबळाच्या इतिहासात ग्रँडमास्टर बनणारे पहिलेच भाऊ-बहीण

    मुंबई : भारताच्या रमेशबाबू वैशालीने आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे. भाऊ प्रज्ञानंद पाठोपाठ वैशालीनेही ग्रँडमास्टर किताबावर आपले नाव कोरले आहे. बुद्धिबळाच्या इतिहासात ग्रँडमास्टर किताब मि‌ळवणारे ते पहिलेच बहिण-भाऊ ठरले आहेत.

    वैशालीने ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक असलेला तिसरा नॉर्म ऑक्टोबरमध्ये झालेल्या कतार मास्टर्स स्पर्धेतच पूर्ण केला होता. मात्र, तिचे एलो गुणांकन २५००पेक्षा कमी होते. त्यामुळे ग्रँडमास्टर किताबासाठी तिला हा टप्पा गाठणे गरजेचे होते. तिने एल्लोब्रेगात स्पर्धेतील कामगिरीमुळे तिचे ‘लाइव्ह रेटिंग’ २५०० झाले आणि तिने ग्रँडमास्टर किताबावर नाव कोरले.

    दुसरी भावंड

    भारताचा विघ्नेश एन. आर. हा भारताचा ८०वा ग्रँडमास्टर ठरला होता. या वर्षाच्या सुरुवातीला विघ्नेशने हा किताब मि‌ळवला होता. यासह विघ्नेश आणि विशाख हे ग्रँडमास्टर किताब मिळवणारे पहिलेच भारतीय भाऊ-भाऊ ठरले होते. विशाख याने २०१९मध्ये ग्रँडमास्टर किताब मिळवला होता. तो भारताचा ५९वा ग्रँडमास्टर ठरला होता.

    २००४ मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी प्रफुल पटेल आग्रही, पण मी नकार दिला ; शरद पवारांचा गौप्यस्फोट

    खेळ आकड्यांचा…

    ८४ – वैशाली भारताची ८४वी ग्रँडमास्टर ठरली.
    ३ – ग्रँडमास्टर किताब मिळवणारी वैशाली तिसरी भारतीय महिला ठरली. यापूर्वी, कोनेरू हम्पीने २००२मध्ये, तर द्रोणावली हरिकाने २०११मध्ये ग्रँडमास्टर किताब मिळवला होता.
    ४२ – ग्रँडमास्टर किताब मिळवणारी वैशाली ४२वी महिला खेळाडू ठरली.
    २ – या वर्षी ग्रँडमास्टर किताब मिळवणारी वैशाली दुसरी महिला खेळाडू ठरली. यापूर्वी, या वर्षी एप्रिलमध्ये चीनच्या झू जिनरने हा किताब मिळ‌वला होता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *