• Fri. Sep 18th, 2026
लग्नानंतर पतीने असं काही रूप दाखवलं की नैराश्य सहन होईना, अखेर पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

नवी मुंबई : २१ व्या शतकामध्ये देखील स्रियांना शारीरिक, मानसिक, संशयाच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा स्रियांना या त्रासाला कंटाळून जीवन नकोसा होतो आणि मग या नैराशातूनच टोकाचे पाऊल उचलले जाते. त्यामुळे उच्च शिक्षित तरुणींनी आपले जीवन संपविल्याच्या अनेक बातम्या आपल्याला ऐकायला वाचायला मिळतात. सद्याच्या काळात देखील लग्न करून गेलेल्या स्त्रीकडून अनेक सासरची मंडळी वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा ठेवत असतात. अशाच प्रकारची एक घटना नवी मुंबई शहरातील कळंबोली परिसरात घडलेली आहे.

इथे पत्नीच्या पाठीशी उभे राहायचे सोडून तिला शारीरिक मानसिक त्रास देऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन नको ते खडे बोल सूनवत असल्याचे समोर आले. यानंतर दररोजच्या त्रासाला कंटाळून पत्नीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंबोली सेक्टर ५ इथे राहणाऱ्या रविना चित्ता वय २५ वर्षे हिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. २०२१ पासून या विवाहितेला तिचा पती त्रास देत होता. शारीरिक, मानसिक छळ, माहेरावरून पैसे आण, संशय घेणे या त्रासाला कंटाळून मयत रविना चित्ता यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असून पती प्रवीण चित्ता यांना कळंबोली पोलिसांनी अटक केली असून कळंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed