• Sat. Sep 21st, 2024
धुक्याचे बळी, पुणे-नाशिक हायवेवर क्रुझरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

पुणे : आंबेगाव तालुक्यातील मंचर शहराजवळ असणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

तिघा जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात तर 2 जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. क्रुझर गाडीने टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. मृत हे एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पंकज खंडू जगताप (वय ३६), मधुकर तुकाराम अहिरे (वय ५२), शांताराम संभाजी आहिरे ( वय ५०) सर्व रा. जायखेडा ता. सटाणा जि. सातारा अशी मृतांची नावं आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – नाशिक महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास माहमर्गावर धुके अधिक होते. त्यात वेगात असणाऱ्या क्रुझर गाडीने पुढे चाललेल्या टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे क्रुझरमध्ये असलेल्या तिघांचा गाडीत अडकून जागेवरच मृत्यू झाला आहे.

धुके अधिक असल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाहन चालकाला गाडीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.

वडील २६/११ च्या हल्ल्यातील जखमांनी गतप्राण, लेकाला अवकाळी पावसाने ओढून नेलं
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास हा अपघात झाला असून क्रुझर चालकाला समोरच्या वाहनाचा अंदाज न आल्याने क्रुझरवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट मागून जाऊन समोर जड वाहतूक घेऊन चाललेल्या टेम्पोला पाठीमागून जाऊन जोरात धडक दिली.

दरोड्यानंतर २१ वर्षीय तरुणीच्या अपहरणाचा गुंता सुटला, ३८ वर्षीय प्रियकराच्या साथीने बनाव
क्रुझ्ररचा पुढचा संपूर्ण भाग ट्रकच्या मागच्या बाजूस शिरल्याने पुढे बसलेल्या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. त्यात पाच जण जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

टायर फुटले, तापी नदीच्या पुलावरून ट्रक नदीत कोसळला

Read Latest Pune Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed