• Sat. Sep 21st, 2024
धक्कादायक! समलिंगी संबंधात खंड; तरुणाला राग अनावर, मित्राला गाठलं अन् घडलं धक्कादायक कृत्य

पुणे: पुणे-नगर रस्त्यावर वाघोली परिसरात महाविद्यालयीन तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. प्रेमप्रकरणातून त्याच्या ओळखीतील तरुणाने खून केल्याची प्राथमिक माहिती तपासात निष्पन्न मिळाली आहे. महेश साधू डोके (२१, रा, वाल्हेबोलाई, ता.हवेली, जि. पुणे ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तो महाविद्यालयातून घरी निघाला होता. बकोरी रस्त्यावर त्याच्यावर ओळखीतील तरुणाने कोयत्याने वार करून जखमी केलं. स्थानिक विद्यार्थ्यांनी महेशला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तस्त्रावमुळे त्याला तातडीने ससून रुग्णालयात हलवण्याचा सल्ला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यानुसार त्याचा एक मित्र त्याला ससूनमध्ये नेत होता. मात्र वाटेतच महेश मरण पावला.
पायातील एका धाग्याने हत्येचा उलगडा, वसईतील त्या कुजलेल्या मृतदेहाची मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह
युवक हा बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. वाढीबोलाही येथे एका होस्टेलमध्ये राहत होता. आरोपी गायकवाड कंत्राटदार आहे. डोके आणि गायकवाड चांगले मित्र होते. त्यांच्यात समलिंगी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. काही काळानंतर डोके याने गायकवाडसोबत संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे गायकवाड डोकेवर चिडून होता. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास ‘आरव ब्लिस सोसायटी’च्या पाठीमागील मोकळ्या मैदानात गायकवाड याने डोके याच्यावर कोयत्याने डोक्यावर, गळ्यावर सपासप वार करून पळून गेला.

त्यानंतर डोके याने त्याला रूग्णालयात घेऊन जाणाऱ्या साक्षीदारास ज्याने त्याला मारले त्या आरोपीचे नाव आणि सदरचा प्रकार प्रेम प्रकरणातून झाल्याचे कळवले होते. त्यानंतर तो बेशुद्ध झाला होता. तपासादरम्यान समोर आलेल्या बाबीनुसार ही हत्या ही समलैंगिक संबंधातून झाल्याची समोर आली आहे. समलिंगी संबंधांत खंड पडल्याने चिडलेल्या तरुणाने कोयत्याने मित्राच्या डोक्यावर, गळ्यावर सपासप वार करून खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी बकोरी रस्त्यावर घडली.

सरकारपेक्षा गावगाड्याचा शेतकरी मोठा; निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने द्या | रविकांत तुपकर

या प्रकरणी या प्रकरणी कृष्णकांत कमलेशकुमार यादव याने फिर्याद दिली आहे. त्यावरून सागर गायकवाड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी इसमाने सोबतच्या साक्षीदारास दिलेल्या तोकड्या वर्णनावरून आरोपीचे पूर्ण सविस्तर वर्णन मिळवण्यात आले असून आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपी ताब्यात येण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed