• Sat. Sep 21st, 2024

पोटच्या पोराच्या जीवाची किंमत फक्त १८ हजार रुपये, बापाचं धक्कादायक कृत्य, कारण…

पोटच्या पोराच्या जीवाची किंमत फक्त १८ हजार रुपये, बापाचं धक्कादायक कृत्य, कारण…

नाशिकः जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या लोखंडेवाडी शिवारात, पालखेड धरणाच्या भराव परिसरात २२ नोव्हेंबर रोजी एक मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. हा मृतदेह किशोर उर्फ टिल्लु दगु उशीर (वय २६ वर्षे रा. खडकजांब, ता. चांदवड) याचा असल्याचं निष्पन्न झालं होतं. मृतदेहाच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि शरीराच्या अन्य भागावर अज्ञात हत्याराने गंभीर वार करुन त्यास ठार केले होते. याप्रकरणी मयताचे नातेवाईक सुरेश सुधाकर कांडेकर (रा. खडकजांब, ता. चांदवड) यांनी वणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिस तपास करत असताना पोलिस तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पित्यानेच मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याचं उघड झालं आहे.

निर्जनस्थळी हत्या झाल्यामुळे कुठलाही साक्षीदार नसताना तपास करणे पोलिसांसमोर आवाहन होते. परंतु गोपणीय आणि तांत्रिक दृष्ट्या तपास करत पोलिसांनी याप्रकरणी संशयित संदीप छगन गायकवाड (वय ३०) आणि त्याचा अल्पवयीन एक १६ वर्षीय साथीदार यास ताब्यात घेतले आहे. यावेळी हत्येच्या हेतूने तपास करत असताना संदीप यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खून केल्याची कबुली दिली.

वाढदिवशी मिळालं मृत्यूचं गिफ्ट, सायंकाळी केक कट केला, सकाळी MBBS च्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला
मयताचे वडील दगु जयराम उशीर (वय ५७ रा. खडकजांब ता. चांदवड) यांनी यांच्या मुलाला मारण्याची सुपारी दिल्याचे सांगितले. मयत मुलगा किशोर उर्फ (टिल्लु) हा दारु पिऊन सतत पैशांची मागणी करुन शिवीगाळ आणि दमदाटी करायचा म्हणून त्या त्रासाला कंटाळुन त्याला जीवे मारण्यासाठी १८ हजार रुपयांची सुपारी संशयित आरोपी संदीप आणि त्याचा सहकारी असलेल्या अल्पवयीन मुलास दिली होती.

दारु पिऊन शिवीगाळ करुन पैशांची सतत मागणी करणाऱ्या मुलाची वडिलांनीच १८ हजार रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वणी पोलिसांनी मयताच्या वडिलांसह तीन संशयितांना ताब्यात घेतले असून संशयितांमध्ये एका अल्पवयीन बालकाचा देखील समावेश आहे. दरम्यान, संदीप याला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी असून विधीसंघर्षित बालकाला बालसुधार गृहात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही संशयितांनी किशोर उर्फ टिल्लुची हत्या केल्याचे कबुल केले असून या संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मयताचे वडील दगु जयराम उशीर यांना ताब्यात घेतले आहे.

एक चूक अन् चक्क ३ कोटींची लॉटरी लागली, या व्यक्तीसोबत जे घडलं ते पाहून सारे थक्क
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed