• Sun. Sep 22nd, 2024
कार्यशाळेसाठी पालघरला गेले; परतताना गाडीचा भीषण अपघात, प्रगतशील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

रत्नागिरी: आपण जगात अनेक देश फिरलो. मात्र कोकणासारखा संपन्न प्रदेश नाही. हे तत्व उराशी बाळगून आंबा पीक आणि शेतीमध्ये नवनवीन संशोधन करणारे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भात लागवडीच्या एसआरटी पीक पद्धतीचा अवलंब करून तब्बल दुसरा क्रमांक मिळवलेले मिलिंद वैद्य यांचा अपघाती मृत्यू झाल्याने अवघ्या कोकणातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमृत पायरी ही आंब्याची नवीन जातही त्यांनी शोधून काढली होती. तसेच कोकणातील अलीकडे बदलत्या हवेनुसार तग धरू शकेल, अशी आंब्याची नवीन जातीचे संशोधन सुरू होते. यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता. रत्नागिरी तालुक्यात रीळ सारख्या ग्रामीण भागात राहून मिलिंद वैद्य यांनी आंबा, नारळ, सुपारी, भात, झेंडू फुले, दुग्धोत्पादन, गांडूळखत, पंचकव्य अशा कृषी आणि कृषी पूरक उद्योगातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते याचाच आदर्श घालून दिला होता.
रविकांत तुपकरांना ताब्यात घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष; शर्वरी तुपकरांचे पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन
दरम्यान पालघर डहाणू परिसरात ते पशुधन विषयावर असलेल्या कार्यशाळेसाठी गेले होते. ते गुजरातच्या दिशेकडून पुन्हा ठाण्याच्या दिशेने येत असताना गाडीवरचा ताबा सुटला. त्यानंतर क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. या अपघातात मिलिंद वैद्य आणि त्यांचा मेहुण्यासह त्याची मुलगी या तिघांचाही अपघाती मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोकणात पूर्वी सर्रास केल्या जाणाऱ्या अलीकडे काहीशी दुर्मिळ झालेल्या लाल साडीच्या तांदुळाची नवीन जातही त्यांनी शोधून काढण्यात यश मिळवलं होतं. ते संशोधनाच्या अंतिम टप्प्यात होते इतकेच नाही तर त्यांनी नाचणीचीही नवीन जात शोधून काढली होती.

यावर अभ्यास करून निवड पद्धतीने शोधून काढली होती. त्यावर निरीक्षण सुरू होत. नाचणी आणि तांदूळ यावर संशोधन अंतिम टप्प्यात होतं. त्यात यशही आलं होतं, अशी ही माहिती त्यांनी अलीकडेच दिली होती. या शेती आणि बागायतीच्या क्षेत्रात यशस्वी काम करणारे करणारे मिलिंद वैद्य यांना आजवर अनेक पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. कोकणातील प्रगतिशील शेतकरी म्हणून ते ओळखले जात होते. मिलिंद यांचा गाव परिसरातही मोठा दबदबा होता. मिलिंद वैद्य हे रीळ गावचे बिनविरोध विद्यमान सरपंच होते. त्यांचा शब्द हा परिसरात प्रमाण मानला जात होता ग्रामपंचायत निवडणुकीतही विरोधकांनी जंग पछाडल्यानंतरही सरपंच पदाचा बहुमान ग्रामस्थांनी त्यांनाच दिला होता. त्यांनी गावात शेती बागायतीवरून व पूरक व्यवसायातून दररोज २५ ते ३० जणांना रोजगारही देऊ केला होता.

अगोदर शिवसेनेला नडले, आता योगेश कदमांविरोधात दंड थोपटले, आदित्य ठाकरेंनी मोहरा उतरवला

मदतशील व परोपकारी स्वभावाचे म्हणून ते दशक्रोशी परिसरात परिसरात सगळ्यांनाच परिचित होते. मिलिंद वैद्य यांच्यावर पुणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, बहीण, पत्नी आणि दोन मुले असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने रीळ मालगुंड परिसरातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी रीळ येथील वैद्य आणि पुण्यातील गोडबोले कुटुंबावरही मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिलिंद वैद्य यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांचे मूळ गाव असलेल्या रीळ गाव परिसरात अस्थीकलश पूजन विसर्जन केले जाणार आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed