• Mon. Nov 25th, 2024
    Mumbai Local: मध्य रेल्वेवरील दादर स्थानकात फलाट क्रमांकात बदल, ‘असे’ असतील बदल

    मुंबई : मध्य रेल्वेवरील दादर स्थानकातील फलाट क्रमांक बदलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ९ डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे सध्याचा फलाट क्रमांक एक हा फलाट क्रमांक आठ होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांकात कोणताही बदल होणार नाही.

    मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक एकच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे फलाट क्रमांक २ कार्यान्वित असणार नाही. सुधारित क्रमानुसार फलाट क्रमांक १ हा फलाट क्रमांक आठ असणार आहे. याशिवाय फलाट क्रमांक तीनला नऊ, चारला दहा, पाचला अकरा, सहाला बारा, सातला तेरा आणि आठला फलाट क्रमांक चौदा असे क्रमांक देण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

    करोनाकाळात झालेल्या खर्चाचा हिशेब जाहीर, जम्बो करोना केंद्रांसाठी तब्बल इतक्या कोटींचा खर्च
    मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील दादर स्थानकातील फलाट क्रमांकावरून रेल्वे प्रवाशांचा सातत्याने गोंधळ उडत होता. एकाच नावाच्या स्थानकात स्वतंत्र क्रमांक असल्याने नवख्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. यामुळे पश्चिम रेल्वेवरील फलाट क्रमांक आहे तसेच ठेवून मध्य रेल्वेच्या लोकल आणि मेल-एक्स्प्रेस फलाटाचे क्रमांक बद्दलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

    दरम्यान, आज माटुंगा ते ठाणे आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने बोरिवली ते भाईंदरदरम्यान शनिवारी रात्री ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. दरम्यान रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.

    नाशिककरांचे पाणी महागणार! पाणीपट्टी दरवाढीबाबत पालिकेने घेतला मोठा निर्णय

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed