सायबर गुन्हेगारीतील वाढ चिंताजनक आहे. २०१८ मध्ये १३७५ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर २०२२ मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये ४७२३ पर्यंत वाढ झाली. यात क्रेडिट आणि डेबिट कार्ड फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे आहेत. २०१८ मध्ये ४६१ तर तेच गुन्हे २०२२ मध्ये ३४९० वर पोहोचले आहेत. २०२२ च्या सायबर गुन्ह्यांमधील गुन्हेगार सापडण्याचे प्रमाण केवळ ८ टक्के इतके आहे.
महिला अत्याचारांतही वाढ मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दहा वर्षांत (२०१३ ते २०२२) बलात्कार आणि विनयभंगाच्या नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे १३० टक्के आणि १०५ टक्के वाढ झाली आहे. २०१३ मध्ये बलात्काराचे ३९१ गुन्हे तर २०२२ मध्ये ९०१ गुन्हांची नोंद झाली आहे. विनयभंगाचे २०१३ मध्ये ११३७ गुन्हे होते, २०२२ मध्ये ही संख्या २३२९ वर पोहोचली आहे. २०२२ मध्ये दाखल बलात्काराच्या गुन्ह्यांपैकी ६३ टक्के गुन्हे अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे आहेत. पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यांपैकी ७३ टक्के गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे.
दरम्यान २०१८ मध्ये मुंबई पोलीस दलातील रिक्त पदांचे प्रमाण २२ टक्के होते. २०२२ पर्यंत यामध्ये ३० टक्के इतकी वाढ झाली आहे. गुन्हे तपास अधिकाऱ्यांच्या एकूण मंजूर पदांपैकी जुलै २०२३ पर्यंत २२ टक्के पदे रिक्त आहेत. २०२२ च्या अखेरपर्यंत एकूण ४४ टक्के प्रकरणांची फोरेन्सिक चाचणी प्रलंबित आहे. मार्च २०२३ पर्यंत फॉरेन्सिक विभागात ३९ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.