• Sat. Sep 21st, 2024
एसटीत ७० प्रवासी; अचानक हवेचा पाईप तुटल्यानं गाडीचे ब्रेक फेल, प्रवाशांमध्ये घबराट, मात्र…

मंचर: आंबेगाव तालुक्यातील मंचर एसटी आगाराची मंचर पिंपळगाव मार्गे पारगाव कारखाना एसटी गाडीचा हवेचा पाईप फुटल्याने अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे प्रवाशी नागरिकांची एकच धांदल उडाली होती. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे चालकाने गिअर कंट्रोल करत गाडीवर नियंत्रण मिळवले. यामुळे एसटी बसमध्ये असणाऱ्या जवळपास ७० प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
तरुणीचा लग्नास नकार; नैराश्यातून तरुणाचा अजब कारनामा, नंतर पोलिसांना पाचारण, नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास मंचर आगारातून मंचर पिंपळगाव तर्फे पारगाव कारखाना बस ही प्रवाशांना घेऊन निघाली होती. संतोष नारायण लांडे चालक आणि वाहक चंद्रकांत चपटे हे प्रवाशांना घेऊन निघाले होते. यात जवळपास ७० प्रवाशी होते. पिंपळगाव सोडून गाडी पुढे आल्यानंतर गाडीतून ८ प्रवाशी खाली उतरले. गाडीला ब्रेक थोडा कमी होता. त्यामुळे गाडीचे स्पीड कमी होता. मात्र गाडीत प्रवाशी अधिक असल्याने गाडी कमी वेगाने चालली होती.

जिल्हा परिषद ते जपानमधील टाॅपच्या इन्स्टिट्यूटपर्यंतच प्रवास; जालन्यातील तरुणीला MBBS साठी आमंत्रण

गाडी चालवत असताना गाडीच्या हवेचा पाईप तुटला आणि त्यातच ब्रेक फेल झाले. गाडीची हवा गेल्यानंतर गाडी गिअर कंट्रोल करून गाडी कंट्रोल केली. मात्र प्रवाशांना याबाबत माहिती मिळताच प्रवाशांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली आहे. मात्र ब्रेक फेल झाल्याने ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत कसेबसे गाडी थांबवली. यामुळे ७० प्रवाशांचे प्राण वाचले. चालकाच्या या कामगिरीने चालकाचे प्रवाशी नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed