• Sat. Sep 21st, 2024
रात्री दुचाकीवरुन आले अन् घरात घुसले; दरोडेखोरांची शेतमजूर दाम्पत्याला मारहाण, नंतर पलायन, काय घडलं?

नांदेड: गाढ झोपेत असलेल्या शेतमजुराच्या घरावर अज्ञातांनी दरोडा टाकून वृद्ध दापत्याला जबर मारहाण केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील लांडगेवाडी येथे घडली. या घटनेत वृद्ध दाम्पत्य जखमी असून त्यांना विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आश्वासनांची पूर्तता करण्यास अधिकारी असमर्थ; नागरिक संतापले, सिडको भवन गेटसमोर धक्कादायक कृत्य
दरम्यान, चोरट्यांनी तीन तोळ्याचे मंगळसूत्र आणि चांदीचे दागिने लंपास केले. दरोड्याच्या घटनेने एकाच खळबळ उडाली आहे. लांडगेवाडी येथे मुख्य रस्त्यालगच मेहरबान चव्हाण यांचे शेतात घर आहे. मागील अनेक वर्षापासून चव्हाण कुटुंबीय शेतातील आखाड्यात राहून शेतीची कामे करत असतात. सोमवारी रात्री शेतीची कामे पूर्ण करुण मेहरबानी चव्हाण आणि कुटुंबीय नेहमी प्रमाणे घरात झोपी गेले होते. मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास मोटारसायकलवर आलेले काही दरोडेखोर घरात घुसले. यावेळी दरोडेखोरांनी लाठ्या काठ्यांनी मेहरबान चव्हाण आणि त्यांच्या पत्नी विमलबाई चव्हाण यांना मारहाण केली. त्यात दोघे जण गंभीर जखमी झाले.

या मारहाणीचा आवाज ऐकून बाजूच्या खोलीत त्यांचा मुलगा, सून आणि त्यांच्या मुलांना जाग आली. खोली बाहेर येताच दरोडेखोरांनी त्यांना देखील शिवीगाळ करुन धमकावले. त्यानंतर वृद्ध महिलेच्या अंगातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र आणि चांदीचे दागिने हिसकावून दरोडेखोर पसार झाले. घटनेनंतर गावात एकाच खळबळ उडाली. दरम्यान जखमी पती-पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्णा कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्यासह पोलिसांनी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

नार्वेकर- फाटक यांच्या एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीबाबत काय म्हणाले सुनील प्रभू?

या प्रकरणी मंगळवारी दुपारी माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान चार ते पाच दरोडेखोर असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दोन दरोडेखोर लांडगेवाडीत वृद्ध दापत्याला जबर मारहाण केली. यात ते जखमी झाले असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत. या घटनेत आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा तपास करण्यात येत आहे, असे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed