• Sat. Sep 21st, 2024

तुळशी विवाहानंतर आता ‘लगीनघाई’, यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी शुभ मुहूर्त कोणते? जाणून घ्या तारखा

तुळशी विवाहानंतर आता ‘लगीनघाई’, यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी शुभ मुहूर्त कोणते? जाणून घ्या तारखा

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: दिवाळीची लगबग संपलेली असून आता तुळशी विवाह आणि त्यानंतर सर्वत्र लग्नाचे वारे वाहणार आहेत. २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान तुळशी विवाह होणार असून त्यानंतर खऱ्या अर्थाने लग्नाचा बार उडणार आहे. येथून सुरू होणारा लग्नाचा मौसम मार्चपर्यंत आणि पुढे उन्हाळ्यात जून महिन्याच्या शेवटपर्यंत राहणार आहे.

गतवर्षीच्या विवाह मुहूर्तांपेक्षा यंदा जानेवारी तसेच फेब्रुवारीत अधिक मुहूर्त आहेत. या दोन महिन्यांत तब्बल २८ दिवस लग्नमुहूर्त आहेत. तर मे आणि जूनमध्ये प्रत्येकी दोन मुहूर्त आहेत. त्यादृष्टीने नवरात्रौत्सवापासूनच सोनेखरेदी झाली आहे. कपड्यांची खरेदी दिवाळीदरम्यान उरकण्याकडे अनेकांचा कल राहिला आहे. निमंत्रण पत्रिकांचे वाटप अंतिम टप्प्यात असून बिछायत, डेकोरेशन, कॅटरिंग, बॅण्डवाला, घोडेवाला, फेटेवाला, मेहंदीवाला, गुरुजी, डीजेवाला आदींचे बुकिंग झाले असून अॅडव्हान्सची रक्कम देण्यात आली आहे. एकूणच काय तर तुळशी विवाह झाल्याझाल्या वेडिंग इंडस्ट्रीमध्ये आर्थिक उलाढाल दिसून येणार आहे.

असे आहेत मुहूर्त

नोव्हेंबर : २५, २७, २८, २९

डिसेंबर : ६, ७, ८, १४, १५, १७, २०, २१, २२, २५, २६.३१

जानेवारी : २, ३, ४, ५, ६, ८, १३, १७, १८, २२, २७, २८, ३०, ३१

फेब्रुवारी : १, २, ४, ६, १२, १३, १४, १७, १८, २४, २६, २७, २८, २९

मार्च : ३, ४, ६, ७, ११, १६, १७, २६, २७, ३०

एप्रिल : १, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २६, २८

मे : १,२

जून : २९, ३०

पैसा लग्नावर नव्हे, शिक्षणावर खर्च व्हावा; सुशीलकुमार शिंदेनी सांगितला आपल्या लग्नाचा भन्नाट किस्सा

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed