• Mon. Nov 25th, 2024
    पीजी अभ्यासक्रम आता एका वर्षाचा होणार; विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मसुदा प्रसिद्ध, जाणून घ्या सविस्तर…

    पुणे: विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने नव्या पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमाचा आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार महाविद्यालये, विद्यापीठांना एक आणि दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम किंवा पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम (पदवी आणि पदव्युत्तर पदवी) सुरू करता येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याची तसेच एका विद्याशाखेतून दुसऱ्या विद्याशाखेत जाण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
    रिफायनरीला विरोध झाल्यास हा प्रकल्प कुठे जाणार? देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले, वाचा नेमकं काय म्हणाले?
    यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार चार वर्षांचा पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तीन वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर पदवीचा समावेश असलेला एकात्मिक अभ्यासक्रमही विद्यापीठांना तयार करता येणार आहे. मशिन लर्निंगसह बहुविद्याशाखीय शिक्षण, आरोग्य निगा, कृषी, विधी अशा व्यावसायिक क्षेत्रांचा समावेश करता येणार असल्याचे प्रा. जोशी यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

    विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्याशाखा बदलण्याची मुभा मिळणार आहे. पदवीला दोन मुख्य विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही एका विषयात पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेता येऊ शकेल. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येतील. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रत्यक्ष, दूरस्थ, ऑनलाइन आणि मिश्र असे पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. नव्या रचनेनुसार दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष पूर्ण करून अभ्यासक्रमातून बाहेर पडता येईल.

    रांगोळीतून हुबेहुब रेखाटली टीम इंडियाच्या तुफान खेळाडूंची चित्रं; वर्ल्डकप फायनलसाठी खास शुभेच्छा

    संबंधित विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदविका दिली जाईल. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये संबंधित शाखेनुसार व्यावसायिक शिक्षण देण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. शैक्षणिक घटकांच्या माहितीसाठी हा मसुदा युजीसीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यूजीसीने नव्या या मार्गदर्शक मसुद्यावर शैक्षणिक घटकांकडून हरकती-सूचना मागवल्या आहेत. त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मसुद्यावर [email protected] या ईमेलवर हरकती-सूचना नोंदवता येतील, असे परिपत्रकात सांगण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed