• Sat. Sep 21st, 2024

तरुणीने लग्नाला नकार दिला, संतापलेल्या तरुणाने सूड उगवण्यासाठी बिल्डिंगमधील वाहनांना आग लावली

तरुणीने लग्नाला नकार दिला, संतापलेल्या तरुणाने सूड उगवण्यासाठी बिल्डिंगमधील वाहनांना आग लावली

नाशिक : शहरातील काठे गल्लीत दोघांकडून एका अपार्टमेंटमधील चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी अशा सात वाहनांची मध्यरात्रीच्या सुमारास जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटने प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अवघ्या काही तासातच दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तरुणीने लग्नास नकार दिला म्हणून ती राहत असलेल्या अपार्टमेंटमधील वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. या घटनेत अपार्टमेंट मधील चारचाकी वाहनासह रिक्षा आणि दुचाकींचे नुकसान झाले आहे.

या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयित सुमित पगारे (रा. धम्मनगर कथडा) याने तरुणीशी ओळख वाढवून संबंध प्रस्थापित करून विवाह करण्याची मागणी केली होती. तरुणीने त्यास नकार दिला म्हणून संशयिताने राग मनात धरून त्याचा सहकारी मित्र संशयित विकी जावरे (रा.काठेगल्ली) याच्या मदतीने तरुणीच्या दुचाकीसह अन्य दुचाकी चारचाकी आणि रिक्षाची जाळपोळ करून नुकसान केले. या अगोदर संशयितांनी मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तरुणीचा भाऊ त्यांच्या अपार्टमेंटच्या बाहेर बसलेला असताना त्यास मारहाण केली. त्यानंतर रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास पुन्हा त्याठिकाणी येऊन वाहनांवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळपोळ केली.

Nashik Leopard: सिडकोच्या दाट वस्तीत बिबट्या शिरला, बघता बघता फ्लॅटमध्ये घुसला, नागरिकांची तोबा गर्दी

यावेळी आरडाओरड झाल्याने अपार्टमेंटच्या खाली येऊन पाहिले असता वाहने जळत असल्याचे दिसले तात्काळ स्थानिक रहिवाशांनी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीचा मोठ्या प्रमाणात भडका उडाल्याने तोपर्यंत बहुतांशी वाहने जळून खाक झाली होती. यापूर्वी देखील संशयित पगारे याने तरुणीच्या दुचाकीची तोडफोड केली होती. घटनेनंतर अपार्टमेंटच्या पार्किंगमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यात दोघे संशयित आढळून आले आहेत. या प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फटाके वाजवण्याच्या कारणावरुन वाद, तरुणाने हटकल्याने शेजाऱ्यांना राग अनावर, ऐन दिवाळीत नाशिक हादरलं

दरम्यान भद्रकली गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासातच या प्रकरणातील दोघा संशयीतांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत. तरुणी राहत असलेल्या अपार्टमेंटमधील अन्य रहिवाशांच्या वाहनांचे देखील नुकसान झाल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणातील संशयतांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed