• Sat. Sep 21st, 2024
गुड न्यूज! २०२४ मध्ये long weekend ची खैरात, शनि-रविवारला जोडून ९ सुट्ट्या, वाचा संपूर्ण यादी

मुंबई : राज्य सरकारने नुकतीच २०२४ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. पुढील वर्षांत धार्मिक आणि राष्ट्रीय सणांच्या २४ आणि एक अतिरिक्त सुट्टी अशा मिळून २५ सुट्ट्या घोषित झाल्या आहेत. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवार यांना जोडून तब्बल ९ सुट्ट्या आल्यामुळे लाँग वीकेंडकडे डोळे लावून बसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे.

नवीन वर्षातली पहिलीच सुट्टी वीकेंडला जोडून आहे. प्रजासत्ताक दिन अर्थात २६ जानेवारी शुक्रवारी येत आल्याने शनिवार रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्या शासकीय कर्मचाऱ्यांना घेता येणार आहेत. परंतु प्रजासत्ताक दिनी सुट्टीचा आनंद लुटण्यापूर्वी ध्वजवंदन करायला विसरु नका.

सोमवारी १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सुट्टी आहे. त्याआधी शनिवार-रविवार असल्याने सलग तीन दिवस सुट्ट्या मिळणार आहेत.

नोव्हेंबरच्या मध्यातही ऑक्टोबर हिट, कमाल तापमान ३६ अंशांवर, थंडीसाठी महिनाभर वेटिंग
याशिवाय महाशिवरात्री शुक्रवार (८ मार्च), होळी सोमवार (२५ मार्च), गुड फ्रायडे शुक्रवार (२९ मार्च) असल्याने एकट्या मार्च महिन्यात लाँग वीकेंडची खैरात आहे. २६ ते २८ मार्च अशी तीन दिवसांची सुट्टी टाकून शनिवार २३ मार्च ते रविवार ३१ मार्च अशी तब्बल नऊ दिवसांची लाँग व्हेकेशन प्लॅन करण्याची संधी आहे.

त्यानंतर बकरी ईद सोमवार (१७ जून), ईद ए मिलाद सोमवार (१६ सप्टेंबर), दिवाळी अमावास्या (लक्ष्मीपूजन) शुक्रवार (१ नोव्हेंबर) आणि गुरुनानक जयंती शुक्रवार (१५ नोव्हेंबर) या सुट्ट्या शनिवार-रविवारला जोडून आल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांचा लाभ घेता येणार आहे.

प्रेग्नन्सीचं ढोंग, रेल्वेने प्रवास करणाऱ्या पाच महिलांना बेड्या, कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल
नवीन वर्षातील पाच सुट्ट्या शनिवारी अथवा रविवारी आल्या आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळी (बलिप्रतिपदा) यांचा समावेश आहे. त्यामुळे या स्वतंत्र सुट्ट्यांचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. राज्य शासनाने ३ नोव्हेंबरला भाऊबीजेची अतिरिक्त सुट्टी जाहीर केली आहे, परंतु त्या दिवशीही रविवार असल्याने ती सुट्टीही स्वतंत्रपणे मिळणार नाही.

वाचा २०२४ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची संपूर्ण यादी

१. प्रजासत्ताक दिन – २६ जानेवारी, शुक्रवार
२. छत्रपती शिवाजी महाराज जयंती – १९ फेब्रुवारी, सोमवार
३. महाशिवरात्री – ८ मार्च, शुक्रवार
४. होळी (दुसरा दिवस) – २५ मार्च, सोमवार
५. गुड फ्रायडे – २९ मार्च, शुक्रवार
६. गुढीपाडवा – ९ एप्रिल, मंगळवार
७. रमझान ईद – ११ एप्रिल, गुरुवार
८. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – १४ एप्रिल, रविवार
९. रामनवमी – १७ एप्रिल, बुधवार
१०. महावीर जयंती – २१ एप्रिल, रविवार
११. महाराष्ट्र दिन – १ मे, बुधवार
१२. बुद्ध पौर्णिमा – २३ मे, गुरुवार
१३. बकरी ईद (ईद उल झुआ) – १७ जून, सोमवार
१४. मोहरम – १७ जुलै, बुधवार
१५. स्वातंत्र्य दिन – १५ ऑगस्ट, गुरुवार
१६. पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) – १५ ऑगस्ट, गुरुवार
१७. गणेश चतुर्थी – ७ सप्टेंबर, शनिवार
१८. ईद-ए-मिलाद – १६ सप्टेंबर, सोमवार
१९. महात्मा गांधी जयंती – २ ऑक्टोबर, बुधवार
२०. दसरा – १२ ऑक्टोबर, शनिवार
२१. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) – १ नोव्हेंबर, शुक्रवार
२२. दिवाळी (बलिप्रतिपदा) – २ नोव्हेंबर, शनिवार
२३. गुरुनानक जयंती – २५ नोव्हेंबर, शुक्रवार
२४. ख्रिसमस – २५ डिसेंबर, बुधवार

Read Latest Mumbai Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed