• Sat. Sep 21st, 2024

सरकारने ५० दिवसांत काय केलं? मुख्यमंत्र्यांनी बारामतीत यावं; धनगर समाज आक्रमक, बारामती बंदची हाक

सरकारने ५० दिवसांत काय केलं? मुख्यमंत्र्यांनी बारामतीत यावं; धनगर समाज आक्रमक, बारामती बंदची हाक

पुणे: धनगर आरक्षणाच्या मागणीकडे शासकीय स्तरावर दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. 16) बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. बारामतीत धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात व्हावा या मागणीसाठी 9 नोव्हेंबरपासून उपोषण सुरु आहे.

धनगर समाज बांधव चंद्रकांत वाघमोडे आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती वेगाने खालावत असतानाही या आंदोलनाला प्रशासकीय स्तरावर गांभीर्याने घेतले जात नसल्याची धनगर समाजाची भावना आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (ता. 16) धनगर बांधवांनी बारामती बंदची हाक दिली आहे.

फटाके वाजवण्याच्या कारणावरुन वाद, तरुणाने हटकल्याने शेजाऱ्यांना राग अनावर, ऐन दिवाळीत नाशिक हादरलं
मुख्यमंत्र्यांनी बारामतीत यावं

धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी चंद्रकांत वाघमोडे यांनी ९ नोव्हेंबरपासून बारामतीतील प्रशासकीय भावना बाहेर उपोषण सुरू केले आहे. आजचा त्यांचा उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान, आज पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी बारामतीतील उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमोडे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली परंतु जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे येत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा चंद्रकांत वाघमोडे यांनी घेतला आहे.

सरकारने ५० दिवसांत काय केलं हे मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे. शासनाचे प्रतिनिधी याचे उत्तर देऊ शकणार नाहीत. याचे उत्तर हे मुख्यमंत्री देऊ शकतील म्हणून मुख्यमंत्र्यांनी इथे यावं किंवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे यांना पाठवावं अशी मागणी उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी केली आहे.

मतं मागायला आले, मतदार म्हणाले कामाचा हिशोब द्या, भाजपचे मंत्री भडकले अन् म्हणाले काँग्रेसला….

दोन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन तुमच्या प्रश्नाविषयी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करते असे आश्वासन दिलं होते. त्यानंतर पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळेंनी उपोषणस्थळी येऊन मुख्यमंत्री यांच्याशी माझं बोलणं झालं आहे असे वाघमोडे यांना सांगितले तसेच उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांच्याशी जिल्हाधिकारी यांचे बोलणे करून दिले. त्यानंतर आज जिल्हाधिकारी या ठिकाणी भेटीसाठी आले होते.

धनगर बांधवांच्या उपोषणस्थळी सुप्रिया सुळेंची भेट, श्रीकांत शिंदेंशी फोनवरुन संवाद

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed