सदर पीडित महिलेशी बळजबरीने शारीरिक संबंध केल्याने तत्कालीन पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक यांनी त्यांना या गंभीर प्रकरणी शासकीय सेवेतून निलंबित केले असून त्यांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
तत्कालीन एलसीबी चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचा हस्तमैथुन करण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला व सदर प्रकरणा बाबत कुठे वाच्यता केली तर तुझे मरण नक्की जवळ आले आहे; असे फोनद्वारे आरोपी व त्याचे साथीदारांनी धमक्या दिल्या म्हणुन मुख्य आरोपी असलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत प्रभाकर पाटील हल्ली नेमणूक नंदुरबार यांच्या विरुध्द तसेच त्यांचे सहआरोपी यांनी पिडीत महिलेला वेळोवेळी फोन करुन धमकावले म्हणून देवपूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 281/ 2023 भादंवि क. 354 (अ), 354 (ब), 354(ड), 509, 506, 34 सह आय.टी. अॅक्ट 67 व 67 (अ) व बळजबरीने शारीरिक संबंध केल्याने 376 प्रमाणे पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आनंद कोकरे धुळे शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
आरोपीचा शोध घेण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन यांचे संयुक्त पथके रवाना करण्यात आले असून सदर प्रकरण संवेदनशिल असुन त्याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News