• Sat. Sep 21st, 2024
Meteor Shower : यंदा अवकाशात ४ दिवस दिवाळी, या तारखेला होणार उल्कावर्षाव

अमरावती : चार दिवसांत सिंह तारकासमूहातून मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. याला ‘लिओनिड्स’ हे प्रसिद्ध नाव आहे. उल्का वर्षावाची तीव्रता, निश्चित, वेळ या गोष्टी खात्रीने सांगता येत नाहीत, निरीक्षणाची तयारी आणि सोशिकता असलेल्यांनीच उल्का पाहण्याचा प्रयत्न करावा, असं सांगण्यात आलं आहे. १७ ते १९ नोव्हेंबरच्या पहाटे उल्का वर्षावाची शक्यता जास्त असून या खगोलीय घटनेमुळे आकाशात चार दिवस दिवाळी राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

मराठी विज्ञान परिषदेचे अमराती विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी असे आवाहन केले आहे सर्व खगोलप्रेमी व जिज्ञासूंनी उल्का वर्षावाचे विलोभनीय दृष्य अवश्य बघावे. ज्यावेळी एखादी उल्का आपल्याला पडताना दिसते, यासंदर्भात लोकांच्या अंधश्रद्धा आहेत. परंतु, अशा अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कुठेच थारा नाही. सिंह तारकासमूहातून होणारा उल्का वर्षाव हा ‘टेम्पलटटल’या धुमकेतूच्या अवशेषामुळे होतो.

अधिक माहितीनुसार, हा धूमकेतू ३३ वर्षांनी सूर्याला भेट देतो. उल्का वर्षाव साध्या डोळ्यांनी मध्यरात्रीनंतर घराच्या गच्चीवर किंवा शहराबाहेर जाऊन अंधारातून पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed