पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातुन ड्रग्स विक्री करणाऱ्या ललित पाटील याला पुणे अमली पदार्थ पथकाने अटक केल्यानंतर सोबत चर्चेत राहिलेले ससूनचे अधिष्ठा डॉ संजीव ठाकूर यांची अखेर अधिष्ठाता पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. ससून मधील ड्रग्स प्रकरण चर्चेत येण्यापूर्वी पूर्वीचे अधिष्ठाता राहिलेले डॉ. विनायक काळे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी बदली करण्यात आली होती. या बदली विरोधात डॉ. काळे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याचा निकाल आज न्यायालयाने दिला आहे. त्यात पुन्हा अधिष्ठातापदी डॉ. काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बीजे वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची जानेवारी महिन्यात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. ससून रुग्णालयातील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. तर डॉ. संजीव ठाकूर यांची वर्णी ससूनच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली होती. ते सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातापदी कार्यरत होते.

डॉ. काळे हे जे.जे. रुग्णालयातील उपअधिष्ठाता पदावरून पदोन्नतीने दीड वर्षांपूर्वी ससूनच्या अधिष्ठातापदी रूजू झाले होते. मात्र, तीन वर्षांच्या आतच त्यांची बदली करण्यात आली, तर डॉ. ठाकूर यापूर्वी ससून रुग्णालयात सर्जरी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्या विरोधात काळे यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला होता. मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, त्या विरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्याचा निकाल आज न्यायालयाने दिला. त्यात पून्हा अधिष्ठातापदी डॉ. काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.