• Mon. Nov 25th, 2024

    खंडोबा देवाची सोमवारी सोमवती यात्रा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जेजुरी मार्गावरील वाहतुकीत बदल

    खंडोबा देवाची सोमवारी सोमवती यात्रा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जेजुरी मार्गावरील वाहतुकीत बदल

    पुणे : महाराष्ट्राचे दैवत असलेल्या जेजुरी येथील श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी म्हणून १३ नोव्हेंबर रोजी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

    १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

    दिवाळीला गावी आलेल्या तरुणावर काळाचा घाला, गाडीवरील ताबा सुटल्याने अनर्थ, अपघातात तरुण जागीच ठार

    जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतुक बदल:

    सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे यामार्गाने वळविण्यात येत आहे. . पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतुक बेलसर – कोथळे- नाझरे -सुपे-मोरगाव रोड मार्ग बारामती या मार्गे वळविण्यात येत आहे.

    वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतुक बदल:

    बारामती व निरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येत आहे.

    महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळूतस्करांची मुजोरी वाढली,थेट तलाठ्यालाच मारहाण
    सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतुक बदल:

    पुणे बाजुकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपुर-कापुरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे-वीर-वाठार मार्गे लोणंद या मागे वळविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

    दीड महिन्यापासून बंद असलेला जेजुरी मंदिराचा गाभारा खुला, दर्शनासाठी भक्तांची गर्दी

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *