• Sun. Sep 22nd, 2024

डिपफेक व्हिडीओचा वाढता धोका; खबरदारी घेण्याचे तज्ञांचे आवाहन, जाणून घ्या याविषयी सविस्तर

डिपफेक व्हिडीओचा वाढता धोका; खबरदारी घेण्याचे तज्ञांचे आवाहन, जाणून घ्या याविषयी सविस्तर

धुळे: सध्या टेक्नालॉजी ही फार अत्याधुनिक झाली आहे. त्याचा फायदा गुन्हेगार घेत असतात. असाच एक प्रकार म्हणजे डिपफेक व्हिडीओ. नेमके यात आपल्याला प्रश्न पडला असेल की डिपफेक व्हिडीओ म्हणजे नेमके काय? डिफ्फेक व्हिडीओ टेक्नॉलाजी म्हणजे आपले हुबेहुब आणि तंतोतंत असे बारीक सारीक डुप्लिकेट एक चुकीच्या पध्दतीने बनवलेले गेलेले व्हिडीओ याला बघून आपल्याला असे वाटेल की हा आपलाच व्हिडीओ आहे का नाही, आपल्याला ते समजणार सुध्दा नाही. अशा पध्दतीने टेक्नॉलॉजीचा गैरवापर करुन हा डिपफेक व्हिडीओ बनवला जातो.
कोल्हापूरमध्ये सहा हजारांहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या, तपासणी गतिमान करा, उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सध्या धुळे शहरासह राज्यात या डिपफेक व्हिडीओ पध्दतीचे अनेक नागरिक बळी पडत आहे. असे प्रसंग हा आपल्यावर देखील ओढावू शकतो म्हणून नागरिकांनी आपले फेसबूक इन्स्टाग्राम अकाऊंट लॉक करावे. सोशल मिडीयावर फोटो टाकताना सदरील फोटोला देखील लॉक करावे किंवा त्या बाबतीत गोपनियता बाळगावी. अज्ञात व्यक्तींना आपण सोशल मिडीयावर कधीही पाहिलेले नसताना देखील आपण त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतो आणि त्यांच्याशी आपण संवाद सुरु करतो, हे देखील करणे आपल्याला कधी महागात पडू शकेल हे सांगता येत नाही.

मराठ्यांच्या जीवावर पोट भरलेत; पैशांची मस्ती; जरांगेंनी पुन्हा विरोधकांना धारेवर धरलं

आपण आपल्या सुरक्षेसाठी आपले नाव गुगलवर सर्च करावे आणि जर आपले फोटो किंवा व्हिडीओ कोणतीही वेबसाईट चुकीच्या पध्दतीने त्यांचा गैरवापर करीत असेल तर त्याची दखल घ्यावी. आपली फसवणूक होत असल्याचे वाटताच तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन धुळ्यातील नामांकित सायबर तज्ञ ॲड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed