या दुकानात कॉफी सेंटरच्या नावाखाली युवक-युवती अश्लील चाळे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुनच पोलिसांनी ही धाड टाकली. सुमित कैलास केसापुरे (वय 29 वर्ष रा. भावसार गल्ली, जालना) हा कॅफेच्या काउंटरवर मिळून आला . या प्रकरणी कॅफे मालक सुमित केसापुरे याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या शॉप मध्ये महाविद्यालयीन मुला-मुलींकडून कॅफे फुड शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी कंम्पार्टमेंन्ट उपलब्ध करुन देण्यात येत होते.यासाठी मुव २५० रु कॅबीन तर ५००रु. सोफासेट रुमचे चार्ज घेऊन या जागेचा वापर मुला-मुलींना हॉटेलच्या बेड रूमसारखा करून दिला जात असल्याचा प्रकार उकडकीस आलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन सदर बाजार जालना हद्दीत दिनांक 07.11.2023 रोजी पोलीस स्टेशनला हजर असतांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, मंठा रोडवरील कंफे फुड ट्रेझर या शॉप मध्ये महाविद्यालयीन मुला-मुलींकडून कॅफे फुड शॉपच्या नावाखाली कंम्पार्टमेन्ट उपलब्ध केली जाते. आणि त्याकरीता 250 रु. कॅबीन व 500/-रु. सोफासेट रुमचे चार्ज घेऊन जागा उपलब्ध केली जाते. त्या जागेमध्ये मुला-मुलींना जागेचा वापर हॉटेलच्या बेड रुमसारखा करून दिला जातो अशी माहिती मिळाली, यावरून सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक श्री प्रशांत महाजन, महिला पोउपनि श्रीमती दिपाली शिदे, महिला पो.हे.का. कल्पना बोडखे, पो. अं. भरत ढाकणे, पो. अं. प्रदिप करतारे यांनी छापा मारण्याचे ठरविले.
तरी सदर ठिकाणी असा प्रकार चालतो काय अशी खात्री करून घेण्यात आली. याबाबत संपूर्ण शहानिशा झाल्यानंतर वरिष्ठांना याबाबत माहिती देण्यात आली. दिनांक 07.11.2023 रोजी सदर कैफे मध्ये महाविद्यालयीन मुले, मुली हे कंम्पार्टमेंन्ट मध्ये बसुन अश्लिल कृत्य करतांना मिळून आले. काऊंटर वर उपस्थित असलेले नामे सुमित कैलास केसापुरे वय 29 वर्ष रा. भावसार गल्ली, जालना हा मिळून आला, त्याचेकडे अधिक चौकशी केली असता येणाऱ्या जोडप्याची कोणत्याही प्रकारची माहिती किंवा नोंद त्याचेकडे मिळून आली नाही, त्याचेकडे सदर कॅफे चालविण्याचा तसेच आतील भागामध्ये केलेल्या बदलाबाबत संबंधीत विभागाची परवानगी नसल्याचे समजले. कॅफेमध्ये पाहणी केली असता त्यामध्ये 5 वेगवेगळे कंम्पार्टमेंन्ट व पश्चिम बाजूस एक सोफा ठेवलेली 5X7 लांबी-रुंदीची रुम व त्यास एक सरकता दरवाजा तयार करण्यात आलेला आहे. आम्ही बोगस जोडप्या मार्फत पाठविलेली 500/-रु. ची नोट त्याचे कॉऊंटर मध्ये मिळून आल्याने आमची खात्री झाली की, कॅफे फूड ट्रेझर च्या नांवाखाली त्या ठिकाणी गैरकृत्य करण्यासाठी छोट्या कंम्पार्टमेन्ट 01 तास कालावधीसाठी उपलब्ध होत होत्या. तसेच सदर कॅफेच्या उत्तरेस एका कोपन्यात घरगुती वापरासाठी वापरण्यात येणारा गॅस सिलेंडर शेगडीला लाऊन वापर करतांना मिळून आला आहे सदर संपुर्ण कारवाईचा सविस्तर पंचनामा करण्यात
आलेला असून सदर कॅफेमध्ये मिळून आलेल्या तीन जोडप्यांना समज देऊन मुक्त करण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक बलकवडे, उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, महिला पोउपनि, दिपाली शिंदे, महिला पो.हे.का. बोडखे, पो.का. भरत ढाकणे, पो.कॉ. प्रदिप करतारे यांनी पार पाडली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News