• Sat. Sep 21st, 2024

अल्पवयीन मुलीवर आरपीएफ जवानाचा अत्याचार, आरोपी अद्यापही मोकाट, मनसे नेते वसंत मोरे आक्रमक

अल्पवयीन मुलीवर आरपीएफ जवानाचा अत्याचार, आरोपी अद्यापही मोकाट, मनसे नेते वसंत मोरे आक्रमक

पुणे: पुणे रेल्वेस्थानकात छत्तीसगड येथून अल्पवयीन प्रेमीयुगल पळून आले होते.या अल्पवयीन मुलीवर आरपीएफ जवानाकडून अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घडना घडली होती. पाच दिवस डांबून ठेवत मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेला महिना होत आला तरी आरोपीला अटक न झाल्याने मनसे नेते वसंत मोरे आक्रमक झाले.

पीडित मुलीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. आरपीएफ जवान अनिल पवार आणि सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटीचा कर्मचारी कमलेश तिवारी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित तरुणी दहावीत शिकत असून ती प्रियकराबरोबर पुण्यात आली होती. १२ ऑक्टोबर रोजी हे अल्पवयीन प्रेमीयुगुल पुणे रेल्वेस्थानकावर आले होते.

पुण्यात बटाट्याचा पाला खाल्ल्याने ४० गाईंना विषबाधा, २० गाईंचा मृत्यू..! शेतकऱ्याचं तब्बल ५० लाखांचं नुकसान

यावेळी तीन व्यक्तींनी त्यांना पोलिसांकडे नेले. पोलीस कर्मचारी अनिल पवार याने त्यांना बराच वेळ तिथे बसवून ठेवले. यानंतर पोलीस कर्मचारी पवार याने अल्पवयीन मुलगी आणि तिच्या प्रियकराला एका इमारतीतील खोलीत डांबले. यानंतर त्याने मुलीला वेगळ्या खोलीत नेत तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या वडिलांनी पुण्यात येत मुलीची सुटका केली होती.

या घटनेला महिना पूर्ण होत आला तरी अद्याप आरोपींना अटक न झाल्याने मनसे नेते वसंत मोरे आक्रमक झाले आहेत. वसंत मोरे यांनी आरोपी आरपीएफ जवान याच्या बायकोच्या नावावर असलेल्या सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटीचे पुण्यातील ऑफिस फोडले. रेल्वे प्रवासात हरवलेल्या प्रवाशांना या इमारतीत ठेवले जाते तसेच या व्यक्तींचा पत्ता शोधून त्यांना त्यांच्या घरी पाठवण्याचे काम सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटी करते. मात्र, या सोसायटीला हरवलेल्या लहान मुलांना या इमारतीत ठेवण्याचा अधिकार नसल्याचे वसंत मोरे म्हणाले.

व्यसनी मुलाची आई-वडिलांना मारहाण, पैशांसाठी तगादा, कंटाळून पित्याचा धक्कादायक निर्णय, काय घडलं?
या अल्पवयीन प्रेमीयुगलाला पोलिसांकडे नेणाऱ्या तीन लोकांबद्दलही मोरे यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. ती तीन लोक सावज शोधण्याचे काम करत असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपींवर अॅट्रोसिटी तसेच पॉस्कोचा गुन्हा दाखल झाल आहे असे वसंत मोरे यांनी सांगितले.

जर येत्या दोन दिवसांत फरार आरोपी जवान सापडला नाही तर इथून पुढच्या विषयांसाठी आरपीएफ साहेब जबाबदार असतील असे वसंत मोरे म्हणाले.या घटनेचे गांभिर्य रेल्वे पोलिसांनी समजून घ्यावे अशी विनंतीही मोरे यांनी केली. तसेच सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटीला कायमस्वरुपी बॅन करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

कुर्ल्यातील फिनिक्स मॉलमध्ये ‘जश्न ए दिवाली’चे लेटर लाइट्स मनसेनं हटवले, मध्यरात्री काय घडलं?

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed