• Sun. Sep 22nd, 2024
सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांची अचानक प्रकृती अचानक खालावली, तातडीने रुग्णालयात दाखल

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गाचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना प्रकृती अस्वास्थामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. आज जिल्हाधिकारी किशोर तावडे कार्यालयात हजर होऊन त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स अटेंड केली. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. शाम पाटील, डॉ. आकरेकर आणि इतर डॉक्टर यांच्या मार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जमेल त्या मार्गाने सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध करा, ओबीसींना एकवटण्याचं छगन भुजबळांचं आवाहन
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची नियुक्ती झाली. के. मंजुलक्ष्मी तब्बल साडे पाच वर्षे सर्वाधिक काळ जिल्ह्यात प्रशासकीय कारभार करणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. कोरोना काळातील त्याचे कार्य सर्वोत्तम ठरले होते. कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना नियुक्ती शासनाने केली आहे. के.मंजुलक्ष्मी ह्या ९ फेब्रुवारी २०१८ ला सिंधुदुर्ग मध्ये जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू झाल्या.

हवाई दौऱ्यात डोंगरावरील उत्तेश्वर देवस्थान दिसले, मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधूनच हात जोडून दर्शन घेतले!

त्यानंतर दोन वर्षानी २० मे २०२० रोजी त्यांची जिल्हाधिकारी पदी शासनाने नियुक्ती केली. त्यानंतर आता त्यांची बदली झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोन वर्ष आणि जिल्हाधिकारी म्हणून तीन वर्ष सहा महिने त्या राहिल्या आहेत. आजवरच्या अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक काळ त्या जिल्ह्यात राहिल्या आहेत. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जिल्ह्यात काम केलेल्या पाच अधिकाऱ्यांना जिल्ह्यातच जिल्हाधिकारी पदी बढती मिळाली. कोरोना काळात सर्वोत्कृष्ट काम केले. त्यांच्या काळातच सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ भारतमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आला. त्याबद्दल त्यांचा दिल्लीत गौरव झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed